Chanakya Niti : पैसा कुठे आणि किती खर्च करावा? चाणक्य यांनी सांगितलं सोपं सूत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी त्या काळात जे विचार मांडले ते आजच्या काळात देखील लागू पडतात. चाणक्य एक अर्थ तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पैशांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये केवळ राज्यकारभार कसा करावा? याबद्दलच माहिती दिली नाही, तर चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी हातात असलेल्या पैशांचा वापर कसा करावा? याबद्दल देखील अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पैसा हा माणसाच्या सर्वात जवळचा मित्र असतो. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट येऊ द्या, तुम्ही सहज त्यामधून बाहेर पडू शकता. तुमच्याकडे पैसा नसणं हेच सर्व दु:खाच कारण असतं. त्यामुळे हातात आलेला पैसा हा जपून वापरला पाहिजे. तुम्ही जो काही पैसा कमवता, त्यातील काही टक्के पैशांची बचत ही केलीच पाहिजे, कारण तुमच्या संकट काळात हाच पैसा तुमच्या उपयोगी पडणार आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान तुमच्याकडे असलेला पैसा कुठे किती खर्च करायचा? याचं मार्गदर्शन देखील चाणक्य यांनी केलं आहे, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.
अत्यावश्यक गोष्टी – चाणक्य म्हणतात आपण पैसा का कमावतो? तर जगातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, आपली राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय झाली पाहिजे, जगात असलेल्या सोई, सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे याकरता. त्यामुळे माणूस जेवढा पैसा कमावतो, त्याच्या 50 टक्क्यापर्यंत खर्च तुम्ही या कारणांसाठी करू शकता. आपल्या मुला बाळांना उत्तम दर्जाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे.
दान, धर्म – चाणक्य म्हणतात आपला या जगात जन्म झाला, त्यामुळे आपण येथील समाजाचं काही देणं लागतो, ही भावना कायम मनात असली पाहिजे, जेव्हा दान, धर्म करण्याची संधी मिळते, तेव्हा हात आखडता घेऊ नका. तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम ही दान, धर्मावर खर्च करू शकता.
बचत – चाणक्य म्हणतात तुम्ही जे काही पैसे कमवता, त्याच्या कमीत कमी 25 टक्के रक्कम ही तुम्ही बचत केलीच पाहिजे, कारण ही बचत संकट काळात तुमचा आधार असते. जर तुमच्याकडे पुरेशी बचत असेल तर तुम्ही कोणत्याही संकटातून सहज बाहेर पडू शकता. हे पैसेच तुमच्या कामी येणार आहे. त्यामुळे खर्च करताना बचतीकडे देखील लक्ष दिले पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
