Vastu Shastra : घरात या ठिकाणी चुकूनही ठेवू नका पैसे, आयुष्यभर रहाल कंगाल
वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही विशिष्ट जागा असतात, जिथे पैसे न ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जर तुम्ही अशा जागी पैसे ठेवले तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल?

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात ज्या समस्या निर्माण होतात, त्यावर उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण पैसा तर खूप कमावतो, मात्र हातात पैसा टिकत नाही. कर्जही वाढत जातं. अनेकदा असं होतं की आपल्या तिजोरीमध्ये पैसा असतो, मात्र अचानक एखादं मोठं संकट निर्माण होतं आणि तो सर्व पैसा त्यावर खर्च होतो. त्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडतो, हे असं का होतं? तर यामागे घरात निर्माण झालेला वास्तुदोष हे देखील कारण असू शकतं. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा काही जागा असतात जिथे पैसा न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा ठिकाणी पैसा ठेवला तर तो कधीही हातात टिकत नाही, खर्च होतो. घरात बरकत राहत नाही, तुम्ही आर्थिक दृष्ट्या अस्थिर बनता. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या शौचालयाला किंवा बाथरूमला लागून असलेल्या भिंतीला खेटून कधीही घराची तिजोरी असू नये. किंवा अशा ठिकाणी पैसा ठेवू देखील नये. यामुळे पैसा खर्च होतो. पैसा हातात टिकत नाही, अचानक घरात आर्थिक संकट निर्माण होतात. त्यामुळे घराची तिजोरी ही कधीही शौचालय किंवा बाथरूमच्या भिंती शेजारी असू नये असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य दिशेला देखील तिजोरी असता कामा नये, जर तुमच्या घराची पैशांची तिजोरी ही घराच्या नैऋत्य दिशेला असेल तर घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, तुमच्या हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे तिजोरी ही कधीही नैऋत्य दिशेला ठेवू नये.
घराची तिजोरी कोपऱ्यात आणि अंधाऱ्या ठिकाणी असू नये- वास्तुशास्त्रानुसार घराची तिजोरी ही कधीही कोपऱ्यात आणि अंधाऱ्या ठिकाणी असू नये. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. हातात आलेला पैसा खर्च होतो, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जिथे स्वच्छता असते, त्या घरावर कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
