AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: पैसा माणसाच्या हातात का टिकत नाही? चाणक्य यांनी सांगितल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. कधी-कधी खूप कष्ट करून देखील माणसाच्या हातात पैसा टिकत नाही, असं का होतं? तर त्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti: पैसा माणसाच्या हातात का टिकत नाही? चाणक्य यांनी सांगितल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 9:09 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आज शेकडो वर्षानंतर देखील मानवाला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे मोठे अर्थतज्ज्ञ होते. पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पैसा कसा कमवायचा? कुठे खर्च करायचा? पैसा कुठे खर्च करू नये? गुंतवणूक कुठे अन् कशी करावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अनेकदा असं होतं की आपण पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट करतो, दिवस रात्र मेहनत घेतो, मात्र हे सर्व व्यर्थ जातं. कारण आपल्या हातात पैसा तर येतो मात्र तो टिकत नाही. असं का होतं? तर यासाठी तीन महत्त्वाचे घटक जबाबदार असतात. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्थिक शिस्त- चाणक्य म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक शिस्त असणं महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही पैसा कमवा, आयुष्याच्या शेवटी तुमच्या हातात पैसा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आयुष्यात आर्थिक शिस्त महत्त्वाची असते, तुम्हाला पैशांचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. तुमचं उत्पन्न किती आणि तुम्ही किती पैसा खर्च करता? याचा योग्य तो ताळमेळ तुम्हाला बसवता आला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसा खर्च करत असाल तर मात्र तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे माणसाने नेहमी अंथरून पाहूनच पाय पसरले पाहिजेत. तर आणि तरच तुमच्या हातात पैसा राहील असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

बचत – चाणक्य म्हणतात तुम्ही जो पैसा कमवत आहात, त्यातील काही पैसे हे तुम्ही तुमच्या संकट काळासाठी बचत केलेच पाहिजे. लक्षात ठेवा तुमच्या संकट काळात जर तुमच्या हातात पैसा असेल तर तुमच्यावर येणाऱ्या संकटाची तीव्रता ही खूप कमी असते. त्यामुळे तुम्ही जर समजा महिन्याला शंभर रुपये कमवत असाल तर त्यापैकी कमीत कमी 25 रुपयांची बचत केलीच पाहिजे, लक्षात ठेवा हेच पैसे तुम्हाला संकट काळात उपयोगी पडणार आहेत.

पैसे कमावण्याचा मार्ग – चाणक्य म्हणतात पैसे मिळवण्याचा मार्ग हा नेहमी स्वच्छ असावा, म्हणजे कोणाची फसवणूक करून किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा कमावू नका, लक्षात ठेवा असा पैसा हा कधीही तुमच्याकडे जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच