AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदोषाच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर

प्रदोष व्रत हे महादेवांना समर्पित आहे. प्रदेशाच्या दिवशी महादेवाची पूजा आणि विशेष मंत्रांचा जप केल्याने जीवनातील अनेक अडीअडचणी आणि अडथळे दूर होतात. तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी येते.

प्रदोषाच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर
shivaImage Credit source: Instagram
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 3:47 PM
Share

प्रदोष व्रत हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे महादेवाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रियोदशी तिथीला हे व्रत केल्या जाते. प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी महादेवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. शनिदोष असलेल्या लोकांसाठी प्रदोष व्रत अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. महादेवांच्या कृपेने हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रतामुळे दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते.

प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पूजा केल्याने आणि विशेष मंत्र्यांचा जप केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. हे मंत्र केवळ शब्द नाही तर शक्तिशाली ऊर्जेचे वाहक आहेत. या मंत्रांचा जप केल्याने मन शांत होते तणाव कमी होतो आणि व्यक्ती आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण होतो.

पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी पहाटे 02:26 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 29 डिसेंबर रोजी पहाटे 03:32 वाजता समाप्त होईल. हे वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत असणार आहे. हा दिवस शनिवार असल्याने हा प्रदोष शनी प्रदोष म्हणून ओळखला जाईल.

या मंत्रांचा करा जप

महामृत्युंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||

हा मंत्र अतिशय शक्तिशाली मानला जातो आणि त्याला मृत्युंजय मंत्र देखील म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने दीर्घायुष्य, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते.

शिव पंचाक्षरी मंत्र

मंत्र: ॐ नमः शिवाय

हा मंत्र महादेवांचा पंचाक्षरी मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने मनःशांती मिळते आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

शिव गायत्री मंत्र

मंत्र: ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्

हा मंत्र महादेवांना समर्पित गायत्री मंत्र आहे. याचा जप केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते.

या मंत्रांचा जप केल्याने होणारे फायदे

मनशांती: या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि तणाव दूर होतो. रोगांपासून मुक्ती: हे मंत्र अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती देतात. सुख आणि समृद्धी: या मंत्रांचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. इच्छापूर्ती: हे मंत्र इच्छा पूर्ण करण्यात मदत करतात. शनिदोषासाठी प्रभावी: शनि दोषाने पीडित लोकांसाठी हे मंत्र अत्यंत फायदेशीर आहेत.

प्रदेशाच्या दिवशी पूजेची वेळ

प्रदोष काळात महादेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष काळ हा सूर्यास्तापासून रात्री दहा वाजेपर्यंत असतो. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाला पाणी अर्पण करून, बेलपत्र अर्पण करावे तसेच उदबत्ती लावा. या दिवशी महादेवाच्या मंदिरात जावून पूजा करा. तसेच शक्य असल्यास गरिबांना भोजन आणि काही दान करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा