Navgrah Mantra | नवग्रह कवच मंत्राच्या जाप करा, आयुष्यातील सर्व त्रास होतील दूर

धार्मिक ग्रंथांनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रात नवग्रह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावतात. असे म्हणतात की, जन्मकुंडलीतील नऊ ग्रहांच्या स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःख आणि आनंद येतात. इतकेच नाही तर जीवनात एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागतो हे नवग्रह देखील ठरवते

Navgrah Mantra | नवग्रह कवच मंत्राच्या जाप करा, आयुष्यातील सर्व त्रास होतील दूर
Navgrah Mantra

मुंबई : धार्मिक ग्रंथांनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रात नवग्रह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावतात. असे म्हणतात की, जन्मकुंडलीतील नऊ ग्रहांच्या स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दुःख आणि आनंद येतात. इतकेच नाही तर जीवनात एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागतो हे नवग्रह देखील ठरवते (Chanting Navgrah Kavach Mantra To Get Rid From Your All Problems In Life).

आयुष्यातील चढ-उतार देखील या नवग्रहांमुळे होते. ग्रहांचे दोष सुधारण्यासाठी बरेच उपाय केले जातात. या नवग्रहात मंत्र कवच खूप उपयुक्त ठरु शकतो. नवग्रह कवच हा ज्योतिष शास्त्रामध्ये एक अतिशय चमत्कारी आणि फायदेशीर मंत्र मानला जातो. यामुळे लोकांच्या आयुष्यात येणारे सर्व त्रास दूर होतात..

नवग्रह मंत्राचे फायदे आणि महत्त्व

मनोभावे दररोज नवग्रह कवच मंत्राचे पठण केल्याने रोग, त्रास, ग्रह दोष, शत्रूचे अडथळे, अशुभ नजर, अशुभ प्रभाव आणि अशुभ गोष्टींपासून मुक्तता मिळते. नवग्रह कवच मंत्र पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, धन-संपत्ती, वैभव आणि यश मिळते.

नवग्रह कवच मंत्र

ओम शिरो मे पातु मार्तण्ड: कपालं रोहिणीपति:।
मुखमङ्गारक: पातु कण्ठं च शशिनन्दन:।।
बुद्धिं जीव: सदा पातु हृदयं भृगुनंदन:।
जठरं च शनि: पातु जिह्वां मे दितिनंदन:।।
पादौ केतु: सदा पातु वारा: सर्वाङ्गमेव च।
तिथयोऽष्टौ दिश: पान्तु नक्षत्राणि वपु: सदा।।
अंसौ राशि: सदा पातु योगश्च स्थैर्यमेव च।
सुचिरायु: सुखी पुत्री युद्धे च विजयी भवेत्।।

नवग्रह कवच मंत्राचा जाप करताना शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.

Chanting Navgrah Kavach Mantra To Get Rid From Your All Problems In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही

Tilak Remedies | टिळा लावल्याने सौंदर्यच नाही तर सौभाग्यही वाढते, जाणून घ्या टिळा लावण्याचे नियम आणि फायदे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI