लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

आपण आपला जीवनसाथी काळजीपूर्वक निवडला पाहिजे जेणेकरुन आपल्याला नंतर अनेक कठीण आव्हानांना सामोरं जायला लागू नये. (choosing for a girl for marriage, Remember the 3 things that Acharya Chanakya said)

लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
Chanakya Niti

मुंबई : विवाह हा कोणत्याही व्यक्तीसाठी मोठा निर्णय असतो. जर जीवनसाथी चांगला असेल तर आयुष्य खूप सोपं होऊन जातं. आणि जर जीवनसाथी निवडताना थोडीशी जरी चूक झाली तर आयुष्यात अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावं लागू शकतं. म्हणूनच, आपण आपला जीवनसाथी काळजीपूर्वक निवडला पाहिजे जेणेकरुन आपल्याला नंतर अनेक कठीण आव्हानांना सामोरं जायला लागू नये. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी देखील चाणक्य नितीमध्ये जीवनसाथी निवडताना योग्य मुलीच्या निवडीसाठी तीन गोष्टींचा विचार करण्यास सांगितलं आहे. (Choosing for a girl for marriage, Remember the 3 things that Acharya Chanakya said)

योग्य पत्नी संपूर्ण कुटुंबाला माया-ममतेने सांभाळू शकते, परंतु जर पत्नी चांगली नसेल तर छानशा कुटुंबालाही दु:खाचे दिवस पाहायला लागू शकतात. जी मुलं लग्नासाठी मुली पाहत आहेत, त्यांनी आचार्य यांनी सांगितलेल्या तीन गोष्टींचा नक्कीच विचार केला पाहिजे.

वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्
रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले.

1) या श्लोकातून आचार्य चाणक्य सांगतात, लग्नासाठी मुलगी पाहताना नेहमीच तिचे विचार आणि गुण पाहायला हवेत. केवळ शारीरिक सौंदर्य पाहू नये. आजची तरुण पिढी सहसा विचार आणि गुणांकडे लक्ष न देता शारीरिक सौंदर्याकडे आकर्षित होते, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नंतर अनेक समस्या येतात. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर नेहमी एखाद्या मुलीचे गुण, संस्कार पहा.

2) मुलीच्या कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष करु नये कारण मुलीवर कुटुंबातील संस्कार कसे झाले आहेत, त्याच्यावर मुलीचं वागणं अवलंबून असतं. जर उच्च विचारांच्या कुटुंबातील मुलगी असेल तर तिच्या अंगी सन्मान, आदर, हे गुण अंगभूत असतात. अशी जर मुलगी आपण जीवनासाथी म्हणून निवडली तर घरातलं वातावरण नेहमीच शांत आणि हसतं खेळतं राहतं.

3) लग्नाआधीच मुलीच्या वागण्याविषयी, तिच्या स्वभावाविषयी परीक्षण करावं. ज्या मुलीवर चांगले संस्कार आहे ती मुलगी नेहमी तिच्या पतीला योग्य मार्गावर जाण्याची सूचना देईल. अशी मुलगी कुटुंबात प्रेमळ वातावरण राखते.

(Choosing for a girl for marriage, Remember the 3 things that Acharya Chanakya said)

हे ही वाचा :

Jyeshtha Amavasya 2021: कधी आहे ज्येष्ठ अमावस्या? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पुजा विधी आणि महत्व

Vastu Tips: घरात पैशांची चणचण? कदाचित तुमच्या ह्या सवयी तर त्याला जबाबदार नाहीत?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI