Vastu Tips: घरात पैशांची चणचण? कदाचित तुमच्या ह्या सवयी तर त्याला जबाबदार नाहीत?

जर तुमच्याकडे धन येत नसेल म्हणजेच पैशांची तुम्हाला चणचण भासत असेल तर वास्तूशास्त्रात त्याची काही कारणं सांगितली आहेत. या कारणांमुळेच लक्ष्मी तुमच्या घरावर रुसली असण्याची शक्यता आहे. (Vastu Tips money And properity for goddess Laxmi)

Vastu Tips: घरात पैशांची चणचण? कदाचित तुमच्या ह्या सवयी तर त्याला जबाबदार नाहीत?
Vastu dosh

मुंबई : आपल्या सगळ्यांमध्ये काही चांगल्या सवयी असतात, काही वाईट असतात. काही जण स्वत:च्या वाईट सवयी बदलण्याचाही प्रयत्न करतात. पण तुम्हाला हे माहित आहे का, तुमच्या काही सवयीमुळेच घरात पैसा खेळत नाही, त्याची चणचण असते? वास्तूशास्त्रानुसार अशी काही कारणं आहेत, त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात निवास करत नाही. कोणती आहेत ती कारणं? पाहुयात…. (Vastu Tips money And properity for goddess Laxmi)

1. साफ-सफाईवर लक्ष न देणे

अनेक जण आहेत जे स्वत:च्या घरातल्या साफ सफाईवर लक्ष देत नाहीत. ते घरात कितीही घाण झाली तरी त्यात आरामानं राहतात. त्यांची हिच सवय त्यांना आजारीही पाडू शकते. अशा घरात पैसा येत नाही आणि आला तरी तो राहात नाही. वास्तूशास्त्रात कमाई आणि घरातल्या स्वच्छतेचा संबंध मानला गेला आहे. असं मानलं जातं की ज्या घरात साफसफाई नसते त्या घरात लक्ष्मी निवास करत नाही.

2. ज्येष्ठांचा आदर न राखणे

अनेक जण आहेत, जे स्वत:च्या आई वडीलांचा सन्मान करत नाहीत. जशीही वेळ पुढं सरकते तसे ते त्यांना ओझं समजतात. हिंदू धर्मात मोठ्यांचा आदर सत्कार करण्याला महत्व आहे. वास्तूशास्त्रानुसारही, जे लोक ज्येष्ठांचा आदरतिथ्य करत नाहीत, अशा घरात नेहमी पैशांची कमी भासते. शास्त्रांमध्ये असं मानलं गेलंय की, जे लोक वयोवृद्धांचा आदर करतात, सेवा करतात त्यांचं आयुष्य, विद्या आणि बल कायम वृद्धिंगत होत असतं.

3.सकाळी उशिरा उठणे

बदललेल्या जीवनशैलीत अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशीरा उठतात. परिणामी अशा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्यातून घरात दरिद्रीपणा येतो असं वास्तूशास्त्र मानतं. त्यामुळेच सकाळी लवकर उठलात तर सकारात्मक ऊर्जा तयार होईल. प्रकृतीही चांगली राहील पण त्यासाठी लवकर झोपावं लागेल.

4. कुठेही थुंकत राहणे

अनेक जण पान तंबाखुचं सेवन करतात. धुम्रपान करतात. त्यामुळे कुठेही दिवसभर थुंकत रहातात. काही जण कारण नसतानाही थुंकत रहातात. त्यांना असं थुंकण्याची सवयच लागलेली असते. वास्तूशास्त्रानुसार ही सवय बदलली नाही तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होण्याची शक्यता नाही.

5. ओरडून बोलणं

वास्तूशास्त्रानुसार जे लोक ओरडून बोलतात त्यांच्यावर शनीची अवकृपा होते. शनीचा प्रभाव अशांवर वाढत जातो. त्यातुनच तणाव आणि गृहदोष होतो. परिणामी धन घरात येत नाही. ह्या सवयीमुळे अनेक वेळा, झालेलं काम बिघडू शकतं.

(Vastu Tips money And properity for goddess Laxmi)

हे ही वाचा :

Chanakya Niti: अशी तीन कामं, जे तुमचा मान सन्मान कमी करतात, कधीच करु नका!

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल