परळीतील प्रभू वैजनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी, ठाण्यातील कोपेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर 75 सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे मंदिर परिसरात नजर ठेवण्यात आलीय.

परळीतील प्रभू वैजनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी, ठाण्यातील कोपेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 12:52 PM

संभाजी मुंडे, हिरा ढाकणे : आज श्रावणातला पहिला सोमवार (Monday) आणि याचनिमित्त प्रभू वैजनाथ मंदिर भाविकांनी गजबजून गेली आहे. बीडच्या परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर भाविकांसाठी सकाळी पाच वाजता खुले करण्यात आले. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे (Corona) भाविकांना दर्शन घेता आलं नाही. यंदा मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले गेल्याने भाविकांची मांदियाळी शिवालयात पाहायला मिळतेय. श्रावणानिमित्त वैजनाथ मंदिर (Temple) परिसर उजळून निघालाय. राज्यातच नाही तर देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी आले आहेत.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर 75 सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे मंदिर परिसरात नजर ठेवण्यात आलीय. ठाण्यातील कोपेश्वर मंदिरात मोठी गर्दी सकाळपासून बघायला मिळते आहे. श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार असल्याने अनेक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्यातील कोपेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

ठाण्यातील कोपेश्वर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीयं. कोरोनानंतर पहिलाच श्रावण सोमवारी असल्याने मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीयंत. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातच नव्हेतर संपूर्ण देशात कोरोनाने हाहा:कार केल्याने अनेक निर्बंध हे लादण्यात आल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाणे देखील शक्य होत नव्हते. यंदा निर्बंध नसल्याने भाविकांची मोठी गर्दी मंदिरात झालीयं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.