Dhumavati Jayanti 2021 | देवी धुमावतीची विधवा स्वरुपात पूजा का केली जाते? जाणून घ्या…

भगवान शिव यांनी प्रकट केलेल्या 10 महाविद्यांपैकी सातवी महाविद्या देवी धुमावती म्हणून ओळखली जाते (Dhumavati Jayanti 2021).  दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला त्यांचा प्राकट्य दिवस पाळला जातो. यावर्षी धुमावती जयंती 18 जून रोजी येत आहे. देवी धुमावतीची विधवेच्या रुपात पूजा केली जाते. कावळ्यावर स्वार देवी धुमावती श्वेत वस्त्र धारण करतात आणि त्यांचे केस नेहमी मोकळे असतात.

Dhumavati Jayanti 2021 | देवी धुमावतीची विधवा स्वरुपात पूजा का केली जाते? जाणून घ्या...
Goddess Dhumavati

मुंबई : भगवान शिव यांनी प्रकट केलेल्या 10 महाविद्यांपैकी सातवी महाविद्या देवी धुमावती म्हणून ओळखली जाते (Dhumavati Jayanti 2021).  दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला त्यांचा प्राकट्य दिवस पाळला जातो. यावर्षी धुमावती जयंती 18 जून रोजी येत आहे. देवी धुमावतीची विधवेच्या रुपात पूजा केली जाते. कावळ्यावर स्वार देवी धुमावती श्वेत वस्त्र धारण करतात आणि त्यांचे केस नेहमी मोकळे असतात (Dhumavati Jayanti 2021 Know Why Goddess Dhumavati Worshiped In Widow Form).

मान्यता आहे की, देवी धुमावतीचे रुप इतके भयंकर आहे की त्या महाप्रलयाच्या वेळी देखील उपस्थित असतात. जेव्हा संपूर्ण विश्व नष्ट होते, काळ संपतो आणि महाकाल स्वतः अंतर्धान होतात, केवळ राख आणि धूर सर्वत्र दिसून येते. तरीही देवी धुमावती तेथे एकट्याच राहतात. त्या देवी पार्वतीचे उग्र रुप असल्याचे म्हटले जाते.

गुप्त नवरात्रीत देवीची विशेष पूजा केली जाते. संकटातून मुक्त होण्यासाठी, रोगाचा नाश करण्यासाठी, युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी देवी धुमावतीची पूजा केली जाते. मान्यता आहे की ज्या व्यक्तीला माता धुमावतीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. परंतु जर देवी रागावली तर त्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. देवी धुमावतीच्या पूजेशी संबंधित माहिती जाणून घ्या –

देवीची विधवा म्हणून पूजा का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीला कैलास पर्वतावर असताना भूक लागली होती. तेव्हा त्यांनी महादेवांकडे काही खाण्याची इच्छा व्यक्त केली. पण, महादेव हे समाधीत लीन होते. त्यांनी अनेकदा महादेवांना विनंती केली, पण महादेवांची समाधी खंडित झाली नाही. दरम्यान, देवीची भूक अनियंत्रित झाली आणि त्या व्याकूल झाल्या.

भुकेने अस्वस्थ असल्याने त्यांनी शंकरजींनाच गिळंकृत केले. पण, शंकराच्या घशातील विषामुळे ते विष देवीच्या शरीरात पोहोचले आणि त्यांच्या शरीरातून धूर येऊ लागला आणि त्यांचे रुप फारच भयंकर झाले. तेव्हा महादेव त्यांना म्हणाले की आजपासून तुझे हे रुप धुमावती म्हणून ओळखले जाईल. परंतु आपल्या पतीला गिळल्यानंतर तुला हे स्वरुप प्राप्त झालं आहे म्हणून तुझ्या या रुपाची विधवा म्हणून पूजा केली जाईल.

पूजा कशी करावी?

धुमावती जयंतीच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तामध्ये उठून स्नान करा. यानंतर गंगाजलने पूजास्थळ पवित्र करा. यानंतर देवीचे चित्र समोर ठेवून तिला जल, फुले, सिंदूर, कुंकू, अक्षता, फळे, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. यानंतर देवी धुमावतीच्या प्राकट्याची कथा वाचा किंवा ऐका. देवीच्या मंत्राचा जप करा. अखेर, देवीला नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागा आणि घराचे त्रास दूर करण्यासाठी प्रार्थना करावी.

या मंत्रांचा जप करा

ॐ धूं धूं धूमावत्यै फट्

धूम्रा मतिव सतिव पूर्णात सा सायुग्मे

सौभाग्यदात्री सदैव करुणामयि:

धूं धूं धूमावती ठ: ठ:

Dhumavati Jayanti 2021 Know Why Goddess Dhumavati Worshiped In Widow Form

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते? जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते

Som Pradosh Vrat 2021 | महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रताला हे उपाय करा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI