Diwali 2022: सूर्यग्रहण आणि लक्ष्मीपूजन यामधला संभ्रम करा दूर, जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी

दिवाळीत सूर्यग्रहण आल्याने अनेकांच्या मनात वेळेविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. चला हा संभ्रम दूर करूया.

Diwali 2022: सूर्यग्रहण आणि लक्ष्मीपूजन यामधला संभ्रम करा दूर, जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी
सूर्यग्रहण Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 5:31 PM

मुंबई, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (solar eclipse in Diwali) 25 ऑक्टोबरला होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात आंशिक असेल. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबर, सोमवारी प्रदोषकाळात साजरी केली जाईल. साधारणपणे दीपावलीच्या (Diwali 2022) दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. मात्र 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 ऑक्टोबरला गोवर्धन पूजा साजरी केली जाणार आहे.  जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. अमावस्येला सूर्यग्रहण होते. 25 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण असेल आणि भारतात दिसणारे पहिले सूर्यग्रहण असेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी झाले होते.

काय आहे ग्रहणाचा कालावधी?

सामान्यतः सूर्यग्रहण ही भौगोलिक घटना असते. पण धार्मिक दृष्टिकोनातून त्याचे वेगळे महत्त्व आहे. जेव्हा हे ग्रहण एखाद्या विशेष प्रसंगी किंवा उत्सवाच्या वेळी होते तेव्हा त्याचे महत्त्व वाढते. 25 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण आइसलँडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 2:29 वाजता सुरू होईल आणि अरबी समुद्रात संध्याकाळी 6.20 वाजता समाप्त होईल. भारतात हे सूर्यग्रहण दुपारी 4.29 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल.

सुतक कालावधी कधी सुरू होणार?

हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो. भारतात सूर्यग्रहण दुपारी 4 नंतर दिसणार आहे. त्यामुळे भारतात त्याचा सुतक काल पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल. त्यामुळे गोवर्धन पूजा 25 ऑक्टोबर ऐवजी 26 ऑक्टोबर आणि भैय्या दूज 27 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.

हे सुद्धा वाचा

देव दिवाळीला चंद्रग्रहण

त्याचप्रमाणे 2022 सालातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पौर्णिमेला जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा सामान्यतः चंद्रग्रहण होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. संपूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाहीत आणि चंद्रावर अंधार असतो.

भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबरला दुपारी 1.32 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल आणि ते रात्री 7.27 पर्यंत चालेल. त्याचा प्रभाव दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि हिंदी महासागरात दिसून येईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा धार्मिक प्रभाव आणि सुतक भारतात वैध ठरणार नाही.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.