वामनरुपी सरकारला जमिनीत गाडू , इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, म्हणत नांदेडचे शेतकरी आक्रमक

भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळीराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते. पण यावर्षी नांदेड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या सरकाररुपी प्रतिकात्मक वामनाला गाडत कौंढा गावात दिवाळी साजरी केली.

वामनरुपी सरकारला जमिनीत गाडू , इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, म्हणत नांदेडचे शेतकरी आक्रमक
farmers
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 10:34 AM

मुंबई : भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने बळीराजाच्या वारसदारांची संस्कृती आहे. म्हणून कार्तिकशुद्ध प्रतिपदेस बळिराजाची पूजा केली जाते. पण यावर्षी नांदेड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला. बळीराजाला अडचणीत आणणाऱ्या सरकाररुपी प्रतिकात्मक वामनाला गाडत कौंढा गावात दिवाळी साजरी केली. राज्यामध्ये शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या प्रकारची दिवाळी साजरी करण्यात आली. अर्धापुर तालुक्यातील शेतकरी संघटनेचा गड असलेल्या कौंढा गावात हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय, मात्र केंद्र आणि राज्य अश्या दोन्ही सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे ‘सरकार ही समस्या है’ असे नारे देत शेतकरी संघटनेने वाजत गाजत वामनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत वामनाला गाडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

काय आहे शेतकऱ्यांचे मत?

बळीराजाला गाडायचं काम वामनाने केलं, तेव्हापासून कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांचेच हाल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांतर्फे वामनाला गाडण्याचा कार्यक्रम दर वर्षी केला जातो. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्याचे मरण. खुली अर्थव्यवस्था आम्हाला मान्य आहे. आमचे हात खूले करा, आम्हाला स्वतंत्र द्या, आमच्या मालाचा हमी भाव ठरवण्याचा अधिकार द्या. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळत नसतील तर या वामनरुपी सरकारला आम्ही असचं जमिनीत गाडू. असे हल्लाबोल शेतकऱ्यांनी यावेळी सरकारवर केला.

बलिप्रतिपदेची आख्यायिका

बलिप्रतिपदेच्या विषयी अशी कथा सांगितली जाते की, पार्वतीने शंभू महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी भगवान विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. असं सांगितलं जातं की, बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

इतर बातम्या :

PHOTO | Chanakya Niti : जीवनाशी संबंधित आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या याबाबत

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

नवग्रहांशी जोडलंय तुमचं नशीब, पाहा कोणत्या ग्रहावर असते देवी लक्ष्मी प्रसन्न

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.