घरात या 5 ठिकाणी बसून कधीही जेवण करू नये; अन्यथा येईल गरीबी
वास्तुशास्त्रात जेवणाचे अनेक नियम सांगितले आहेत. जंस की घरात आपण कोणत्या ठिकाणी जेवायला बसावे अन् कोणत्या ठिकाणी बसू नये. हे देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण यामुळे अजाणतेपणे गरिबीला आमंत्रण देऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी अशा असतात ज्यामुळे ज्या केल्याने काही अडचणी दूर करू शकतो. जसं की, वास्तूशास्त्रानुसार घरातील अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनावर वेगळाच प्रभाव पडतो. त्यामुळे काही मुद्दे लक्षात ठेवून आपण आपले जीवन थोडे सोपे करू शकतो. वास्तुशास्त्रात आपण जेवणासंदर्भातील देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की घरात नक्की कोणत्या ठिकाणी जेवायला बसू नये याबाबतही वास्तूशास्त्रात सांगितलं आहे. यात अनेक रहस्ये लपलेली आहेत. तर आज आपण जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार कोणत्या चुकीच्या ठिकाणी बसून जेवण केल्याने आपल्या जीवनात गरिबी येऊ शकते. तर चला जाणून घेऊयात ती घरातील ही कोणती ठिकाणं आहेत जिथे आपण चुकूनही जेवू नये
1. दाराजवळ जेवू नये वास्तुशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की दाराजवळ किंवा त्याच्या दाराच्या चौकटीवर अन्न खाणे हे सर्वात अशुभ असते. जर तुम्ही जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे असे करत असाल तर आताच हे थांबवा. या ठिकाणी जेवण केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा सहज येते. असे म्हटले जाते की या ठिकाणी देवाचा वास असतो. असे केल्याने तुम्ही देवी लक्ष्मीचा अपमान करता असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत पैशाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
2. प्रार्थनास्थळाजवळ जेवू नका जर तुम्ही पूजास्थळाजवळ बसून जेवण करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की पवित्र ठिकाणी बसून जेवण करणे चांगले आहे, तर तुम्ही खूप चुकीचे आहात. असे करणे अशुभ मानले जाते. पूजास्थळाजवळ जेवण करून तुम्ही देव-देवतांचा अपमान करण्यासारखं मानले जाते. जर तुम्ही असे करत असाल तर ते टाळा. असे केल्याने घराची शांती आणि आनंद भंग होतो. त्याचबरोबर सुख आणि समृद्धी देखील तुमच्यापासून दूर जाते.
3. कधीही बेडवर जेवू नका जर तुम्ही बेडवर बसून आरामात जेवत असाल तर हे करणे ताबडतोब थांबवा. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती देखील बिघडू शकते. असे केल्याने पैशाचे नुकसान होते. तसेच, तुम्ही मानसिक ताणतणावाने वेढले जाल.
4. घाणेरड्या जागी जेवू नका नेहमी स्वच्छ जागी जेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही घाणेरड्या जागी बसून जेवलात तर तुमच्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. आतापासून दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण फक्त स्वच्छ जागी बसून जेवा.
5. गॅस स्टोव्हजवळ जेवू नका बऱ्याच वेळा असे घडते की लोक घाईघाईत किंवा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे गॅस स्टोव्हजवळ अन्न खायला लागतात. घाईघाईतही असे करणे टाळा. जर तुम्ही अशा ठिकाणी बसून अन्न खात असाल तर त्यामुळे घराची शांती भंग होते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)