चैत्र पौर्णिमेला ‘या’ वस्तूंचे करा दान, तुमचे घर वर्षभर भरून जाईल आनंदाने

हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस केवळ धार्मिक दृष्ट्याच पवित्र नाही, तर दान आणि आध्यात्मिक प्रगतीसाठीही अत्यंत शुभ मानला जातो. चला, या दिवशी दान करण्यासाठीच्या शुभ गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

चैत्र पौर्णिमेला या वस्तूंचे करा दान, तुमचे घर वर्षभर भरून जाईल आनंदाने
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 4:49 PM

हिंदू धर्मात पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यात काही दिवसांनी येणाऱ्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते. याच दिवशी संकटमोचन हनुमानाची जयंती देखील साजरी केली जाते. पंचांगानुसार 2026 मध्ये चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेला केलेले दान आणि पुण्यकर्म केवळ मानसिक शांतीच देत नाहीत, तर घरात सुख आणि समृद्धी देखील आणतात. तुम्हालाही जर तुमचे घर वर्षभर आनंदाने भरलेले हवे असेल, तर या चैत्र पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार आणि परंपरेनुसार काही वस्तूंचे दान नक्की करा. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की चैत्र पौर्णिमेला कोणत्या वस्तूंचे दान करावे.

चैत्र पौर्णिमेला काय दान करावे?

अन्नधान्याचे जसे की गहू, तांदूळ दान करा

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. यामुळे घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही.

पाणी आणि घागरीचे दान

उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याने भरलेले भांडे किंवा घागर दान करणे शुभ मानले जाते. यामुळे तहानलेल्यांना दिलासा मिळतो आणि आशीर्वादही लाभतो.

कपडे दान करा

गरजू लोकांना नवीन किंवा स्वच्छ कपडे दान केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते. हे दान गरिबी दूर करण्यासही मदत करते असे मानले जाते.

गूळ आणि साखर दान करा

गोड पदार्थ दान केल्याने नातेसंबंध गोड राहतात आणि कुटुंबातील प्रेम वाढते.

फळे आणि अन्नदान करा

गरिबांना भोजन देणे किंवा फळे दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. यामुळे देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो.

दिवे आणि तूप दान करा

मंदिरात दिवा लावणे किंवा तुपाचे दान करणे हे जीवनात अंधार दूर करून प्रकाश आणण्याचे प्रतीक आहे.

चैत्र पौर्णिमेला विशेष उपाययोजना

भगवान विष्णू आणि हनुमानजींची पूजा करा.

सत्यनारायण कथेचे पठण करा

घरातील देव्हाऱ्यात आणि तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावाणे.

चैत्र पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

चैत्र पौर्णिमा हा भगवान विष्णू, चंद्रदेव आणि भगवान हनुमान यांच्या पूजेसाठी एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी गंगेत स्नान करणे, उपवास करणे, पूजा करणे आणि दान करणे यांमुळे सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. असा विश्वास आहे की या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे अनेक पटींनी फळ मिळते, ज्यामुळे मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us