Durgashtami : मासिक दुर्गाष्टमीला आहे विशेष महत्त्व, मनोकामना पूर्ण करण्यासाठी करा हे विशेष उपाय
दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीला दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो

मुंबई : हिंदू धर्मात दर महिन्याला दुर्गाष्टमीचा (Durgashtami 2024) उपवास केला जातो. अष्टमी महिन्यातून दोनदा येते, त्यापैकी शुक्ल पक्षातील अष्टमी ही दुर्गाष्टमी अष्टमी म्हणून साजरी केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीला दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होते. याशिवाय कोणत्याही कामात अडथळा येत नाही. चला तर जाणून घेऊया मासिक दुर्गाष्टमीची नेमकी तिथी कोणती आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी कोणते उपाय केले जातात.
मासिक दुर्गाष्टमी तिथी
पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 17 जानेवारी 2024 रोजी रात्री 10.06 वाजता सुरू होत आहे. 18 जानेवारी रोजी रात्री 9.44 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, गुरुवार, 18 जानेवारी रोजी मासिक दुर्गाष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे.
तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या गोष्टी करा
मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गादेवीला सोळा श्रृंगाराचे साहित्य अर्पण करा. या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. या दिवशी माता दुर्गाला फुलं आणि लवंगांची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
या मंत्राचा जप करा
मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा मातेच्या या मंत्रांचा जप केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. अशा स्थितीत मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या मंत्राचा जप करावा.
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरातील 8 किंवा 9 लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या. जर हे शक्य नसेल तर तुम्ही मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेट वस्तू देऊ शकता. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आपला आशीर्वादाचा वर्षाव करात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
