AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात ईदचा चंद्र कधी दिसणार, ईद-उल-फितर कोणत्या दिवशी साजरी केली जाईल?

Eid Ul Fitr 2024 date & timing : मुसलमान बांधवांध्ये ईदचा उत्साह... भारतात कधी दिसणार ईदचा चंद्र..., भारतात कधी साजरी होणार ईद-उल-फितर? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईदचा उत्साह आणि जल्लोष...

भारतात ईदचा चंद्र कधी दिसणार, ईद-उल-फितर कोणत्या दिवशी साजरी केली जाईल?
| Updated on: Apr 09, 2024 | 2:39 PM
Share

भारतातच नाही तर जगभरात ईदची तयारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू आहे. ईदचा चंद्र दिसल्यानंतर मुसलमान बांधव ईद साजरी करतात. सध्या प्रत्येक मुसलमान बांधव ईदच्या चंद्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. इस्लामिक कॅलेंडरमध्ये, रमजान हा वर्षाचा नववा महिना आहे आणि दहावा महिना शव्वाल आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी, इस्लामचे अनुयायी ईद साजरी करतात. तर आज जाणून घेऊ मुसलमान बांधव कधी ईद साजरी करतील आणि त्यांना ईदचा चंद्र कधी दिसेल…

जर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कतार, कुवेत, बहरीन, इजिप्त, तुर्की, इराण, युनायटेड किंगडम आणि मध्य पूर्व आणि पश्चिमेकडील इतर देशांमध्ये 8 एप्रिलच्या संध्याकाळी चंद्र दिसला तर मुसलमान बांधवांनी 9 एप्रिल म्हणजे आज ईद साजरी केली असती. पण 8 एप्रिलच्या संध्याकाळी चंद्र दिसला नाही…

परंतु जर 9 एप्रिलच्या संध्याकाळी देखील चंद्र दिसला नाही, तर या देशांमध्ये मंगळवारी, 9 एप्रिल रोजी चंद्राची रात्र असेल, म्हणजेच बुधवारी, 10 एप्रिल 2024 रोजी ईद साजरी केली जाईल. त्याच वेळी जर भारतात 09 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी चंद्र दिसला, तर ईद दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 10 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 एप्रिलच्या संध्याकाळी देखील चंद्र दिसला नाहीतर, भारत आणि इतर दक्षिण आशियाई देशांतील मुस्लिम बांधाव दुसऱ्या दिवशीही उपवास ठेवतील. त्यानंतर बुधवार, 10 एप्रिल रोजी इफ्तारनंतर चंद्र दिसेल आणि गुरुवारी म्हणजेच 11 एप्रिल 2024 रोजी ईद साजरी केली जाईल. जगातील प्रत्येक मुसलमान बांधव चंद्र कधी दिसेल याच प्रतीक्षेत आहेत.

सांगायचं झालं तर, चंद्र दिसल्यानंतरच ईदची तारीख ठरवली जाते अशी इस्लाममध्ये मान्यता आहे. चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. सध्या संपूर्ण जगभरात ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.