Vastu tips for Sleep | पैशांची कमतरता भासतेय ? , झोपेसंबंधी वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा

| Updated on: Jan 18, 2022 | 10:45 AM

वास्तूमध्ये (Vastu) केवळ वास्तु संबंधीत कामांसाठीच नाही तर आपल्या काही सवयी बद्दल देखील सांगण्यात आले आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

Vastu tips for Sleep | पैशांची कमतरता भासतेय ? , झोपेसंबंधी वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा
house
Follow us on

मुंबई : वास्तूमध्ये (Vastu) केवळ वास्तु संबंधीत कामांसाठीच नाही तर आपल्या काही सवयी बद्दल देखील सांगण्यात आले आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. एवढेच नाही तर त्याला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते त्यामुळे बाधित व्यक्ती अनेकदा आजारी पडते अन्यथा त्याला पैशांची (Money)कमतरता भासू लागते अशी मान्यता आहे. योग्य दिशेने झोपल्याने व्यक्ती केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत नाही तर त्याला चांगली झोपही (Sleep)लागते. असेही मानले जाते की जर तुम्ही योग्य दिशेनुसार झोपत नसाल तर तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. आम्ही तुम्हाला रात्री किंवा दिवसा झोपताना कोणत्या दिशेला असावे. चला तर मग जाणून कोणत्या आहेत त्या सवयी.

दक्षिण दिशेला झोपण्याचे फायदे
वास्तुशास्त्रानुसार या दिशेकडे डोके ठेवून झोपणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की या दिशेकडे डोके ठेवून झोपल्याने मानसिक समस्या दूर राहतात आणि आर्थिक स्थितीही सुधारते. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये, ते अशुभ आहे. लोहचुंबक उत्तर- दक्षिण स्थिर असते. आपल्या शरिरात सुद्धा लोह असते. त्यामुळे या दिशेला तोंडकरुन झोपल्यास आपले शरिर देखील स्थिर होऊ शकते. किंवा रक्त प्रवाह थांबू शकतो. त्यामुळे या दिशांना तोंड करुन झोपू नये.

पूर्व दिशा देखील सर्वोत्तम आहे
जर तुम्ही दक्षिणेकडे डोके ठेवून झोपू शकत नसाल तर पूर्वेकडे डोके ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा. दक्षिणेनंतर पूर्वेकडे जाणे शुभ मानले जाते. असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते आणि इतर देवतांची कृपाही कायम राहते असे म्हणतात.

पूर्वेकडे तोंड करून झोपावे.
असे मानले जाते की जे घरी एकटे कमावतात, त्यांनी पूर्वेला डोके ठेवून झोपणे चांगले असते. असे केल्याने ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होतात आणि त्यामुळे पैशांशी संबंधित समस्याही बर्‍याच अंशी दूर होऊ शकतात असे सांगतात. तेथे अभ्यास करणाऱ्यांनीही पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती

shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व