AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : या तीन प्राण्यांच्या मूर्तींनी आयुष्यच बदलून जाईल, झटपट घरात येईल पैसा

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्रामध्ये काही मूर्ती या खूपच शुभ माण्यात आल्या आहेत, फेंग शुई शास्त्रानुसार या मूर्ती जर तुमच्या घरात असतील तर पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होतो, तुम्हाला घराला यश, सुख, समृद्धी लाभते.

Feng Shui : या तीन प्राण्यांच्या मूर्तींनी आयुष्यच बदलून जाईल, झटपट घरात येईल पैसा
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 8:25 PM
Share

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. ज्याप्रमाणे वास्तुदोष निवारणासाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्याचप्राणे फेंग शुईमध्ये देखील काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंग शुई या शास्त्राचा उगम चिनमध्ये झाला. परंतु त्यानंतर हळुहळु संपूर्ण जगभरात या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार झाला. अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड कष्ट करतो, पैसे कमावतो, परंतु ते पैसे आपल्या हातात टिकत नाहीत. महिन्याच्या शेवटी बँक अकाउंटमध्ये खडखडात असतो. असं अनेकांच्या बाबतीमध्ये घडतं, असं होऊ नये, पैसा घराकडे आकर्षित व्हावा यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. फेंग शुईनुसार काही मूर्ती या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत, तसेच या मूर्ती घरात असाव्यात असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

हत्तीची मूर्ती – फेंग शुईुनुसार हत्तीची मूर्ती घरात ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. हत्तीला पैसा, प्रगती आणि स्थिरतेच प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात हत्तीची मूर्ती आहे, अशा घराकडे पैसा आकर्षित होतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. तसेच ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून देखील संरक्षण होतं. असंही फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

कासवाची मूर्ती – फेंग शुईमध्ये कासवाच्या मूर्तीला देखील खूप शुभ माण्यात आलं आहे, ज्या घरात कासवाची मूर्ती असते, त्या घराचं सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण होतं, असा दावा फेंग शुईमध्ये करण्यात आला आहे. फेंग शुईमध्ये कासवाला स्थिरतेचं प्रतिक मानलं गेलं आहे. त्यामुळे घरात कासवाची मूर्ती असावी असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

मोर – फेंग शुई शास्त्रामध्ये मोराला देखील शुभ मानण्यात आलं आहे. फेग शुईमध्ये मोराला समृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे. ज्या घरात मोराची मूर्ती असते, त्या घरात कायम सुख, समृद्धी आणि शांती असते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने