Festival July 2022: ‘या’ महत्त्वाच्या सणांनी भरला आहे जुलै महिना; अशी आहे यादी

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री जुलैमध्ये (Festival July 2022) साजरी केली जाईल. यासोबतच जगन्नाथ रथयात्राही पुरीमध्ये निघणार आहे. त्याचबरोबर जुलैमध्ये गुरुपौर्णिमेचा सणही साजरा केला जाणार आहे. हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya 2022) आणि हरियाली तीज सारखे महिलाभिमुख सणही याच महिन्यात येणार आहेत. दुसरीकडे जुलैमध्ये देवशयनी एकादशीला भगवान विष्णू सृष्टीचा सर्व भार शिवावर सोपवून विश्रांती घेतील. या सगळ्याशिवाय […]

Festival July 2022: 'या' महत्त्वाच्या सणांनी भरला आहे जुलै महिना; अशी आहे यादी
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:43 PM

आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री जुलैमध्ये (Festival July 2022) साजरी केली जाईल. यासोबतच जगन्नाथ रथयात्राही पुरीमध्ये निघणार आहे. त्याचबरोबर जुलैमध्ये गुरुपौर्णिमेचा सणही साजरा केला जाणार आहे. हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya 2022) आणि हरियाली तीज सारखे महिलाभिमुख सणही याच महिन्यात येणार आहेत. दुसरीकडे जुलैमध्ये देवशयनी एकादशीला भगवान विष्णू सृष्टीचा सर्व भार शिवावर सोपवून विश्रांती घेतील. या सगळ्याशिवाय जुलैमध्ये अनेक महत्त्वाचे सण येतील. यासोबतच आषाढ महिन्याची पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही तारीख खूप खास मानली जाते. या दिवशी गुरुंची विशेष पूजा केली जाते. तसेच काही ठिकाणी याला भैरव पौर्णिमा (bhairav pornima 2022) असेही म्हणतात. या दिवशी सर्व लोक आपापल्या कुळातील भैरवाची पूजा करतात.

चातुर्मासाला होणार प्रारंभ-

धार्मिक मान्यतांनुसार, आषाढ शुक्ल एकादशीला भगवान विष्णू विश्वाचा संपूर्ण भार महादेवावर सोपवतात आणि विश्रांतीसाठी जातात. याबरोबर चातुर्मास सुरू होतो. यावेळी देवशयनी एकादशी 10 जुलै रोजी साजरी होणार आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यांत विवाह वगैरे शुभ कार्ये होत नाहीत. या चार महिन्यांत तीज उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरचा हा पाचवा महिना आहे. या महिन्यात इतर अनेक मोठे सण साजरे केले जातात. यातील बहुतांश सण हे महिलाभिमुख असतात. महिन्याच्या शेवटी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.

जाणून घ्या कोणता सण कधी-

01 जुलै शुक्रवार – जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात 03 जुलै रविवार – विनायक चतुर्थी व्रत 05 जुलै मंगळवार – स्कंद षष्ठी 06 जुलै बुधवार – वैवस्वत पूजाशुक्रवार

हे सुद्धा वाचा

08 जुलै – भादली नवमी 09 जुलै मंगळवार – आषाढ दशमी 10 जुलै रविवार – देवशयनी एकादशी, वासुदेव, द्वादशी, चातुर्मास सुरू सोमवार 11 जुलै – सोम प्रदोष व्रत, वामन द्वादशी, विजया पार्वती व्रत बुधवार 13 जुलै – गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, व्यास पूजागुरुवार

14 जुलै – श्रावण महिना सुरू होत आहे शनिवार 16 जुलै – गणेश चतुर्थी व्रत मंगळवार 19 आणि 26 जुलै – मंगळा गौरी व्रत 24 जुलै रविवार – कामिका एकादशी सोमवार २५ जुलै – प्रदोष व्रत

गुरुवार 28 जुलै – हरियाली अमावस्या 31 जुलै रविवार – हरियाली तीज

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.