Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व काय?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि परंपरा

कार्तिक महिना हिंदू धर्मासाठी खूप खास असतो. या महिन्यात अनेक सण असतात. आता दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा 'कार्तिक पौर्णिमेला' साजरी केली जाते, कार्तिक पौर्णिमेला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे.

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व काय?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि परंपरा
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 8:25 AM

मुंबई : कार्तिक महिना हिंदू धर्मासाठी खूप खास असतो. या महिन्यात अनेक सण असतात. आता दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ‘कार्तिक पौर्णिमेला’ साजरी केली जाते, कार्तिक पौर्णिमेला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमा यावर्षी शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी होत आहे.धार्मिक शास्त्रानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला गंगास्नानाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा ८वा महिना कार्तिक महिना आहे.

1. शास्त्रात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व सांगितले आहे, या पौर्णिमेला गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते.

2. विष्णूच्या भक्तांसाठीही हा दिवस खूप खास आहे, खरं तर भगवान विष्णूचा पहिला अवतार याच दिवशी झाला होता. पहिल्या अवतारात भगवान विष्णू मत्स्य म्हणजेच माशाच्या रूपात होते. म्हणून या सणाचे जास्त महत्त्व आहे.

3. या दिवशी भगवान शंकरानी त्रिपुरासुर नावाच्या महान असुराचा वध केला होता. तेव्हापासून भोलेनाथला त्रिपुरारी असेही म्हणतात.भगवानांनी राक्षसाचा वध केल्यावर देवता खूप प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूने शिवाचे नाव त्रिपुरारी ठेवले, जे शिवाच्या अनेक नावांपैकी एक आहे.

4. शीख धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस विशेष आहे, या दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचा जन्म झाला होता. या दिवशी शीख धर्मातील सर्व लोक दिवाळीप्रमाणे दिवे लावतात याला गुरु पर्व असेही म्हणतात.

5. कार्तिक पौर्णिमा हा सण दिवाळीप्रमाणे संध्याकाळी दिवा लावून साजरा केला जातो. एवढेच नाही तर या दिवशी गंगास्नान, दीपदान, इतर दान आदींचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक घरात दिवे लावतात.

6. या दिवशी आकाशात चंद्र उगवतो तेव्हा भगवान शिव प्रसन्न होतात आणि शिव, संभूती, संती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा या सहा कृतिकांचं पूजन करून प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

इतर बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कधीही विसरु नका, आयुष्यातील अडचणी सहज दूर होतील

Chhath Puja 2021 | सुखी संसारासाठी, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आज सूर्याला वाहिला जाणार अर्घ्य

Female Thumb Prediction : हाताचा अंगठा सांगतो महिलांचा स्वभाव, जाणून घ्या याबाबत सर्व काही

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.