Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? वाचा या मागची कथा…

64 कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनानांचा लाडका आहे. महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. अगदी लांबच्या पल्ल्यावर प्रवासासाठी रवाना होताना देखील आपल्या तोंडून ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयघोष निघतो.

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? वाचा या मागची कथा...
गणपती बाप्पा मोरया
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 4:47 PM

मुंबई : 64 कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा समस्त भक्तजनानांचा लाडका आहे. महाराष्ट्रात गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. अगदी लांबच्या पल्ल्यावर प्रवासासाठी रवाना होताना देखील आपल्या तोंडून ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयघोष निघतो. पण गणपती बाप्पा असं म्हटल्यानंतर पुढे ‘मोरया’ हाच शब्द का येतो?, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते, या विषयी फार कमी लोकांना आणि कदाचितच माहिती असावे. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे तब्बल 600 वर्ष जुनी एक कथा आहे.

गणपती बाप्पाचे परम भक्त मोरया गोसावी!

महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक निस्सीम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे ते याच ठिकाणी स्थायिक झाले. सतत 42 दिवस तप करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न केले होते.

स्वतः बाप्पाने दिले दर्शन

मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे. असे सांगितले जाते की, वयाच्या तब्बल 117व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु, पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते. आपल्याला देवाचे दर्शन होत नाही या विचाराने मोरया गोसावी नेहमी दुःखी राहू लागले. मग, बाप्पाला तरी आपल्या भक्ताचं दुःख कसं बरं पाहवेल? मग, एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.

… आणि गणपती बाप्पा मोरया म्हटले जाऊ लागले!

दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना, त्यांच्या ओंजळीमध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. बापचे निस्सीम भक्त म्हणून मोरया गोसावी यांचे नाव गणेशाशी अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया नक्कीच म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाऊ लागले.

हेही वाचा :

Lord Ganesha | तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा…

अकोल्यात कडुलिंबाच्या झाडाला श्री गणेशाचं रुप, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश

Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.