Ganeshotsav 2023 : या कारणांमुळे गणपतीला प्रिय आहे मोदक, 21 मोदकांचे असे आहे महत्त्व

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2023) धूम सुरू आहे. बाप्पाला खूश करण्यासाठी आणि त्याच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवण्यासाठी लोकं मोदक बनवण्याच्या वेगवेगळ्या पाककृती शोधत आहेत. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Ganeshotsav 2023 : या कारणांमुळे गणपतीला प्रिय आहे मोदक, 21 मोदकांचे असे आहे महत्त्व
मोदक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 2:15 PM

मुंबई : गणपतीची पूजा करताना नैवेद्यामध्ये मोदकांचा समावेश अवश्य होतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपतीला मोदक खूप प्रिय आहे.  गणपतीला छप्पन पकवान्न जरी अर्पण केले तरी मोदकाशिवाय ते प्रसन्न होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळेच गणेशाच्या पूजेत मोदक अर्पण केले जातात. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2023) धूम सुरू आहे. बाप्पाला खूश करण्यासाठी आणि त्याच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवण्यासाठी लोकं मोदक बनवण्याच्या वेगवेगळ्या पाककृती शोधत आहेत. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का? गणपती उत्सव किंवा गणेशपूजेच्या वेळी मोदक का अर्पण केले जातात? यामागे एक खास कारण आहे, चला तर मग जाणून घेऊया गणपतीला मोदक इतके प्रिय का आहेत.

या तीन कारणांमुळे गणपतीला मोदक आवडतात

पौराणिक कथा

प्रचलित कथेनुसार, एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते. परशुराम तिथे पोहोचल्यावर गणेशजींनी त्यांना दारात थांबवले. परशुराम रागावले आणि गणेशाशी भांडू लागले. युद्धात परशुरामाने भगवान शंकराने दिलेल्या वज्राने गणपतीवर वार केला. त्यामुळे गणपतीचा एक दात तुटला. तुटलेल्या दातांमुळे गणेशजींना अन्न ग्रहण करण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांच्यासाठी मोदक तयार करण्यात आले. मोदक मऊ असतात आणि त्यांना फार चावण्याची गरज नसते. म्हणूनच गणपतीने मनापासून मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला.

21 मोदकांचा नैवेद्य का दाखविला जातो?

एका पौराणिक कथा भगवान गणेश आणि आई अनुसूया यांच्याशी संबंधित आहे. एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासोबत अनुसूयाच्या घरी गेले होते. आई अनुसुईयाने विचार केला की प्रथम श्रीगणेशाला भोजन द्यावे. ती श्रीगणेशाला अन्न भरवत राहिली पण त्यांनी भूक काही संपत नव्हती. अनुसुईयाला वाटले की त्यांना काहीतरी गोड खाऊ घातलं तर कदाचित गणपतीचं पोट भरेल. आई अनुसुईयाने गणपतीला मोदक दिले. गणपतीने असे 21 मोदक खाल्ले. त्यानंतर त्यांचे पोट भरले. तेव्हापासून गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.