AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनं सर्वांसाठी चांगले नाही, ‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी सोनं घातक, कोणती आहे तुमची रास?

सोनं प्रत्येकाला आवडते पण सोनं घातल्यानंतर अनेकाच्या जीवनात समस्या येतात. त्यामुळे काही राशींसाठी सोनं घातक ठरु शकतं... तर जाणून घ्या कोणत्या राशीसाठी सोनं घातक आहे, कोणती आहे तुमची रास?

सोनं सर्वांसाठी चांगले नाही,  'या' राशींच्या व्यक्तींसाठी सोनं घातक, कोणती आहे तुमची रास?
| Updated on: May 12, 2026 | 3:22 PM
Share

भारतात सोन्याला फार महत्त्व आहे. सोनं एक वस्तू जी भारतात लग्न सोहळ्यात किंवा कोणत्या कार्यक्रमात फार महत्त्वाचं आहे. एवढेच नाही तर, सोनं ही अशी वस्तू आहे जी प्रत्येकाला आवडते. सोन्याचे भाव गगनाला भीडत आहेत, आज सोनं सर्वसामान्य माणसाचं स्वप्न बनत चाललं आहे. सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. असं म्हटलं जातं की स्त्रिया साधारणपणे सोन्याकडे आकर्षित होतात. मात्र, पुरुषसुद्धा विविध प्रकारे सोनं घालतात. काही लोक सोनं मालमत्ता म्हणून खरेदी करून ठेवतात. त्याचप्रमाणे, ज्योतिषशास्त्रात सोन्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजेच, ज्योतिषशास्त्रात धातूंना विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की पिवळा धातू सोनं हा देवांचा देव असलेल्या गुरू ग्रहाशी संबंधित आहे.

जरी सोनं परिधान केल्याने भाग्य लाभते, तरी कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्यास त्यामुळे गंभीर नुकसानही होऊ शकते. म्हणजेच, ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींसाठी सोने परिधान करणे फारसे शुभ नसते. काहींना त्यामुळे विविध आजार, अडचणी, आर्थिक नुकसान आणि मानसिक विकारांना सामोरे जावे लागू शकते. चला पाहूया कोणत्या राशींना सोन्याचा फायदा होत नाही किंवा केवळ अडचणींचा सामना करावा लागतो.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी सोनं घालणं फारसं फायदेशीर ठरत नाही. वृषभ, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना सोनं घातल्याने मानसिक अस्वस्थता आणि अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना सोनं घातल्याने किरकोळ आरोग्य समस्या आणि नातेसंबंधात काही अस्वस्थता व अडचणी येऊ शकतात.

त्याचबरोबर, मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन राशींसाठी सोनं धारण करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यामुळे मेष राशीच्या व्यक्तींचे धैर्य आणि ऊर्जा वाढतं. तर, सिंह राशीसाठी ते सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडते. धनु आणि मीन राशीचा स्वामी असलेला गुरु ग्रह, या पाचही राशींसाठी सोने धारण करण्यास फायदेशीर मानला जातो.

सोन नेहमी योग्य रीतीने परिधान केले पाहिजे, म्हणजेच जर अंगठी घालायची असेल, तर ती अनामिकेत किंवा तर्जनीत घालणं उत्तम मानलं जातं. त्याचप्रमाणे, पायात कधीही सोनं घालू नका. कारण हे गुरू ग्रहाचा अनादर करण्यासारखं आहे. हे आपल्याला दारिद्र्याकडे नेतं. उत्तम सोने, म्हणजेच शुद्ध सोने परिधान करणे सर्वोत्तम आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us