AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Gochar 2025 : माघ पौर्णिमेपासून ‘या’ राशींच्या व्यवसायात होणार भरभराट

Surya Dev Pooja: ज्योतिषशास्त्रानुसार, माघ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, भगवान सूर्य राशी बदलतील. ज्या दिवशी सूर्य देव आपली राशी बदलतो त्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. यासाठी 12 फेब्रुवारी रोजी कुंभ संक्रांती साजरी केली जाईल. संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि आदर केला जातो. तसेच, पूजा झाल्यानंतर दान केले जाते.

Surya Gochar 2025 : माघ पौर्णिमेपासून 'या' राशींच्या व्यवसायात होणार भरभराट
| Edited By: | Updated on: Feb 12, 2025 | 1:45 PM
Share

हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जाते. वैदिक कॅलेंडरनुसार, माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवाची मानापासून पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक गंगा स्नान आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात ज्यामुळे त्यांना देवी देवतांचे आशिर्वाद मिळतात. तसेच पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यामुळे जप केल्यामुळे आणि दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होते . पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक उर्जा आणि विचार निर्माण होतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आत्म्याचा प्रतिनिधी सूर्य देव त्याची राशी बदलेल. माघ पौर्णिमेला सूर्य देव मकर राशी सोडून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कुंभ राशीमध्ये बुध राशी आधिच उपस्थित आहे. त्यावेळा तुमच्या कर्माचे फळं देणारा शनिदेव कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कुंजलीतील बुध आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. बुधादित्य योग झाल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना व्यवयामध्ये प्रगती आणि फायदे होतील.

मेष राशी – माघ पौर्णिमेच्या दिवसापासून मेष राशीच्या लोकांच्या जीवनात विशेष बदल दिसून येतील. या राशीच्या लोकांना व्यवसायात अकल्पनीय नफा मिळेल. मेष राशीच्या लोकांचा व्यवसाय बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. शिवाय, गुंतवणुकीतून मिळणारा नफाही दुप्पट होईल. आडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नवीन जोडीदार मिळू शकेल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार देखील करू शकता. तुम्हाला शुभ कार्यात यश मिळेल. रवि आणि बुध ग्रहाच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल.

वृषभ राशी – वृषभ राशीच्या लोकांना बुधादित्य योगाचाही फायदा होईल. या राशीत गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. त्याचबरोबर, रवि आणि बुध राशीच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना शेअर बाजारातून फायदा होईल. बिघडलेले काम पूर्ण होईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक नवीन मार्ग तयार होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुमचे भविष्य उज्वल बनवू शकता. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ योग्य आहे. तुमचा व्यवसाय वाढविण्यात तुम्हाला यश मिळेल. माघ पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, साखर, पीठ, दूध आणि दही दान करा.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....