Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार ‘या’ गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी

पौराणिक कथेनुसार ऋषी पराशर आणि देवी सत्यवती यांचे पुत्र महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस महर्षी वेद व्यास यांची जयंती (Vyas jayanti 2022) म्हणजेच गुरुपौर्णिमेचा सण (Guru purnima 2022) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2022 मध्ये गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी येत आहे. असे मानले जाते की वेद व्यासांनी […]

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी जुळून येतोय ग्रहांचा विशेष योग; राशींनुसार 'या' गोष्टींचे दान केल्याने वाढेल सुख-समृद्धी
नितीश गाडगे

|

Jul 03, 2022 | 5:38 PM

पौराणिक कथेनुसार ऋषी पराशर आणि देवी सत्यवती यांचे पुत्र महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस महर्षी वेद व्यास यांची जयंती (Vyas jayanti 2022) म्हणजेच गुरुपौर्णिमेचा सण (Guru purnima 2022) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2022 मध्ये गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी येत आहे. असे मानले जाते की वेद व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेगवेगळ्या वर्गांमध्ये वर्गीकरण केले. या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 13 जुलैला ग्रहांचा विशेष योग्य जुळून येत असल्याने या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी हंस, षष्ठ, भद्रा आणि रुचक असे चार विशेष योग तयार होत आहेत. त्याचबरोबर बुध ग्रहामुळे बुधादित्य योग (Budhatitya yog) तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु मंत्र आणि दीक्षा घेतल्याने व्यक्तीला जीवनात प्रगती आणि समृद्धी मिळते. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रहांच्या विशेष संयोगात कोणत्या गोष्टींचे दान करणे फलदायी ठरेल.

  1. मेष- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाचे कपडे किंवा गुळाचे दान करू शकतात.
  2. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी या दिवशी साखरेचे दान करणे फलदायी ठरेल.
  3. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हिरवा मूग दान केल्यास किंवा गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास वैवाहिक जीवनात सुख-शांती मिळेल.
  4. कर्क- चिंता दूर करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी गरजूंना तांदूळ दान करावे.
  5. सिंह- गुरु पौर्णिमेला गहू दान करणे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते.
  6.  कन्या – या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी.
  7.  तूळ – या राशीच्या लोकांसाठी लहान मुलींना खीर दान करणे शुभ आहे.
  8.  वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांनी अभ्यासाशी संबंधित साहित्य दान करावे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें