Guruvar Vrat Vidhi: गुरुवारचे व्रत जीवनात घेऊन येते सुख-समृद्धी, उपासना विधी आणि महत्त्व

या दिवशी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा आणि व्रत केल्यास कुंडलीत गुरूचे स्थान बळकट होते अशी मान्यता आहे.

Guruvar Vrat Vidhi: गुरुवारचे व्रत जीवनात घेऊन येते सुख-समृद्धी, उपासना विधी आणि महत्त्व
गुरुवारचे व्रत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 7:04 AM

Guruvar Vrat Vidhi: हिंदू धर्मात उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीच्या पूजेसाठी समर्पित आहे. गुरुवार हा भगवान विष्णू (Vishnu worship) आणि बृहस्पति पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. पूजेसोबतच गुरुवारचे व्रत देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा केली जाते. या दिवशी पूजा आणि व्रत केल्यास कुंडलीत गुरूचे स्थान बळकट होते अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म, यश आणि समृद्धीचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की गुरुवारी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा असेल तर त्याची पूजा पद्धत जाणून घेणेही गरजेचे आहे. गुरुवारच्या व्रताची पद्धत जाणून घेऊया.

गुरुवार व्रत पूजा विधि

हे सुद्धा वाचा

गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावे. त्यानंतर भगवंताचे चिंतन करून व्रताचा संकल्प करावा.

बृहस्पतिसमोर किंवा केळीच्या झाडात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर देवाला चंदनाचे तिलक चालावे. सुगंधित उदबत्ती ओवाळावी.  हरभरा डाळ, पिवळी फुले आणि गूळ अर्पण करावे. या दिवशी तुम्ही प्रसादात बेसन लाडूही बनवू शकता.

हातात थोडी हरभरा डाळ आणि फुले घेऊन गुरुवारच्या व्रताची कथा वाचा. कथा संपल्यानंतर आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास करावा. या दिवशी पिवळे कपडे, पिवळी फळे आणि पिवळे अन्न याला प्राधान्य द्यावे.

संध्याकाळी पुन्हा पूजा करा. या दिवशी मीठ न खाता उपवास केल्यास अधिक फळ मिळते. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे केळीचे सेवन करू नये. गुरुवारच्या दिवशी केळी दान . याव्यतिरिक्त, तुम्ही गुरुवारी घरात साबण वापरू नका आणि केस धुवू नका.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.