AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guruwar Upay: गुरुवारी केलेल्या ‘या’ सोप्या उपायामुळे आर्थिक स्थिती राहते बळकट

आर्थिक समस्या, लग्नाला होत असलेला विलंब आणि पत्रिकेत गुरुचे स्थान मजबूत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी खालील उपाय करू शकता.

Guruwar Upay: गुरुवारी केलेल्या 'या' सोप्या उपायामुळे आर्थिक स्थिती राहते बळकट
गुरुवार उपाय Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 07, 2022 | 6:43 PM
Share

मुंबई, धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेशी संबंधित आहे. सोमवारी जसे भगवान शिव, मंगळवारी बजरंगबली हनुमान. तसेच गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि देवतांचे गुरु बृहस्पति यांच्याशी आहे. भगवान विष्णूसह भगवान बृहस्पतीची पूजा आणि गुरुवारी व्रत केल्यास शुभ फळ मिळते. यासोबतच या दिवशी केळीच्या झाडाची विधिवत पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी असे काही उपाय केले जाऊ शकतात. जे केल्याने जीवनात प्रगती, कीर्ती, आर्थिक स्थिती मजबूत होण्यासोबतच प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया गुरुवारशी संबंधित काही उपाय.

गुरुवारचे उपाय

  1. पत्रिकेत गुरुचे स्थान मजबूत करण्यासाठी- कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी स्नान वगैरे करून गुरूची विधिवत पूजा करावी. यासोबतच तुळशीच्या माळेने या मंत्राचा १०८ वेळा जप करा – बृं बृहस्पतये नमः
  2. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी- जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी तांदळाची खीर बनवा आणि त्यात केशर घाला. यानंतर ही केशर खीर भगवान विष्णूला अर्पण करावी. यानंतर ते स्वतः प्रसाद म्हणून घ्या.
  3. लग्नाला विलंब- गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. कारण केळीचे झाड भगवान बृहस्पतीशी संबंधित आहे. या दिवशी केळीच्या झाडाची विधिवत पूजा करून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. यासोबत सात परिक्रमा करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात.
  4. केळीची मुळं घाला- गुरुवारी केळीचे मूळ पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून गळ्यात घाला. असे केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होईल. यासोबतच पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.