Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

बजरंगबली हे ब्रह्मचारी आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की ते विवाहित असण्यासोबतच ते एका मुलाचे पिता देखील आहेत? नसेल माहिती तर हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2021) निमित्ताने संकटमोचक हनुमानची पत्नी आणि त्यांच्या मुलाशी संबंधित कथा जाणून घ्या

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी
Hanuman Marriage Story
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 1:13 PM

मुंबई : बजरंगबली हे ब्रह्मचारी आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की ते विवाहित असण्यासोबतच ते एका मुलाचे पिता देखील आहेत? नसेल माहिती तर हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti 2021) निमित्ताने संकटमोचक हनुमानची पत्नी आणि त्यांच्या मुलाशी संबंधित कथा जाणून घ्या (Hanuman Jayanti 2021 Know The Story About Brahmchari Hanumans Wife Suvarchala And Son Makardhwaj).

पौराणिक कथेनुसार, हनुमानाला भगवान सूर्य यांनी प्रशिक्षित केले होते. जेव्हा सूर्यदेव त्यांना अनेक विद्या शिकवत होते, तेव्हा ते एका धर्मसंकटात सापडले. कारण काही विद्या अशा होत्या ज्या फक्त विवाहित पुरुषालाच शिकवल्या जाऊ शकत होत्या. पण हनुमान हे अविवाहित होते. अशा परिस्थितीत सूर्यदेवाने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.

सूर्यदेवाच्या मुलीशी हनुमानाचं लग्न

हनुमानजी यांनी सूर्यदेवाचा प्रस्ताव मान्य केला. पण, आता त्यांना विवाह योग्य कन्या मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर सूर्यदेवाने बजरंगबलीला आपल्या तेजस्वी आणि तपस्वी कन्या सुवर्चलाबरोबर लग्न करण्यास सांगितले. यानंतर हनुमानाचे लग्न सुवर्चलाशी झाले आणि त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाकडून पूर्ण शिक्षा ग्रहण केली. लग्नानंतर सुवर्चला कायमची तपश्चर्यात मग्न झाली. त्यामुळे विवाहित असूनही हनुमान जी नेहमीच ब्रह्मचारी राहिले. पराशर संहितामध्ये हनुमानाच्या विवाहाचा उल्लेख आहे.

वाल्मिकी रामायणात पुत्राचा उल्लेख आहे

वाल्मिकी रामायणात यांनी हनुमानाच्या मुलाचा उल्लेख सापडतो. पौराणिक कथेनुसार, अहिरावणने राम-लक्ष्मणचे अपहरण केले आणि त्याला पाताळ पुरी येथे नेले. तेव्हा राम-लक्ष्मणच्या मदतीसाठी पातळ पुरी येथे पोहोचलेल्या हनुमानाची भेट पाताळाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मुलगा मकरध्वजशी झाली. जो दिसायला अगदी वानरासरखा होता. तो हनुमानजीला आपला परिचय देत म्हणाला की मी हनुमान पुत्र मकरध्वज आहे आणि मी पाताळ पुरीचा द्वारपाल आहे.

मकरध्वजचं ऐकून हनुमान जी संतप्त झाले. तेव्हा मकरध्वज त्यांना त्याच्या उत्पत्तीची कहाणी सांगितली. मकरध्वज म्हणाला, जेव्हा तुम्ही रावणाची लंका जाळली, तेव्हा अग्नीच्या ज्वालांमुळे तुम्हाला घाम फुटण्यास सुरुवात झाली. शेपटीची आग विझविण्यासाठी आपण समुद्रात उडी मारली. त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाचा थेंब निघाला जो एका माशाने तिच्या तोंडात घेतला आणि ती गरोदर राहिली. काही काळाने अहिरावणाच्या सैनिकांनी समुद्रातून त्याच माशाला पकडून आणले. जेव्हा माशाचं पोट कापण्यात आलं तेव्हा माझा जन्म झाला. त्यानंतर मला पाताळाचा द्वारपाल बनविण्यात आले.

Hanuman Jayanti 2021 Know The Story About Brahmchari Hanumans Wife Suvarchala And Son Makardhwaj

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 : कोरोना संकटापासून दूर राहायचंय? हनुमान जयंतीला संकटमोचकाला ‘या’ वस्तू करा अर्पित

Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मंत्र

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.