Hanuman Jayanti 2021 : कोरोना संकटापासून दूर राहायचंय? हनुमान जयंतीला संकटमोचकाला ‘या’ वस्तू करा अर्पित

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खूप खास आहे. आज चैत्र पौर्णिमेसह हनुमान जयंती 2021 (Hanuman Jayanti 2021) आहे. तसेच, मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित मानला जातो.

Hanuman Jayanti 2021 : कोरोना संकटापासून दूर राहायचंय? हनुमान जयंतीला संकटमोचकाला 'या' वस्तू करा अर्पित
Panchmukhi-Hanuman

मुंबई : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खूप खास आहे. आज चैत्र पौर्णिमेसह हनुमान जयंती 2021 (Hanuman Jayanti 2021) आहे. तसेच, मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत हनुमान जयंतीचे महत्त्व बरेच वाढले आहे. हनुमान हे कलियुगचे साक्षात देवता असल्याचे म्हटले जाते, तसेच ते संकटमोचकही मानले जातात. असे मानले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी जर भगवान हनुमानाची पूजा केली, तर ते लवकर प्रसन्न होऊ शकतात (Hanuman Jayanti 2021 Offer These Things To Lord Hanuman At Evening Today).

कोरोना काळात घरोघरी या साथीचे एक मोठे संकट पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबियांनाही या साथीचा त्रास होत असेल तर आज संध्याकाळी संकटमोचक हनुमानजी यांना त्यांच्या आवडीच्या वस्तूं श्रध्देने समर्पित करा आणि त्यांची पूजा करा. कुटुंब आणि जगाला या साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करा.

जाणून घ्या हनुमानजींना काय अतिप्रिय आहे –

लाडू

लाडू हे बजरंगबलीला अतिप्रिय आहे. आज संध्याकाळी पूजा करताना तुम्ही त्यांना बेसनाचे किंवा बूंदीचे लाडू अर्पित करु शकता. तुम्ही बेसनाचा शिराही बनवून त्यांना अर्पित करु शकता.

पान

घरावर आलेल्या मोठ्या संकटापासून मुक्त होण्यासाठी आज संध्याकाळी हनुमानाची विधीवत पूजा करुन त्यांना पानाचा विडा अर्पण करा आणि संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना करा.

चोला

हनुमानाला चोला अतिप्रिय आहे. आज बजरंगबलीला चोला अर्पण करा. यासह त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार किंवा पिंपळाच्या पानांनी तयार केलेला हार अर्पण करा. पिंपळाच्या पानांवर जय श्री राम नक्की लिहा. यानंतर संकटमोचक हनुमानाला संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

चमेलीचे फूल

असे मानले जाते की चमेली फुलांनी हनुमान लवकर प्रसन्न होतात. संध्याकाळी हनुमानजीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यांना चमेलीचे फुले अर्पण करा आणि घरात शांती आणि आनंद राहावा यासाठी प्रार्थना करा.

सुंदरकांड पाठ

शक्य असल्यास या दिवशी सुंदरकांड वाचा. यामुळे हनुमान प्रसन्न होतात जर आपण सुंदरकांडचं पठन करु शकत नसाल तर हनुमान चालीसा पाच वेळा श्रद्धेने वाचा. हनुमानजीची पूजा करण्यापूर्वी भगवान श्री रामांची आठवण करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवाला प्रार्थना करा की कोरोना संकट किंवा जीवनातील कोणतीही समस्या दूर व्हावी.

Hanuman Jayanti 2021 Offer These Things To Lord Hanuman At Evening Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल

Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मंत्र