AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2025: फुलांपासून बनवा सुंगधित सेंद्रिय रंग, पद्धत खूपच सोपी

रंगपंचमी निमित्त सर्वत्र प्रचंड उत्साह दिसून येतो. लोक एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा करतात. काही ठिकाणी देवाला रंग अर्पण केल्यानंतर लोक रंगपंचमी खेळायला सुरुवात करतात. पण हल्ली बाजारात मिळणारे रंग आपल्या त्वचेसाठी घातक असतात यासाठी तुम्ही घरच्या घरी फुलांपासून रंग कसा बनवायचा ते जाणून घ्या. --

Holi 2025:  फुलांपासून बनवा सुंगधित सेंद्रिय रंग, पद्धत खूपच सोपी
| Edited By: | Updated on: Mar 10, 2025 | 4:37 PM
Share

यंदा रंगपंचमी हा सण १४ मार्च म्हणजेच शुक्रवारी देशभरात आणि देशाबाहेर सुद्धा साजरा केला जाईल. रंगपंचमीचा निमित्ताने काही ठिकाणी सर्वात प्रथम देवाला गुलाल, रंग अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानंतरच रंगपंचमी खेळायला सुरुवात करतात. सध्या एकमेकांना रंग लावताना या गोष्टी लक्षात ठेवा कि तुम्ही विकत आणलेलं रंग हे रसायनमुक्त तसेच शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे, म्हणून तुम्ही घरच्या घरी फुलांपासून रंग तयार करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांपासून रंगीबेरंगी रंग बनवू शकता आणि ते स्वतः रंगपंचमी खेळण्यासाठी वापरू शकता.

बाजारात रसायनांचा वापर करून गडद रंग तयार केले जातात. याशिवाय रंगांची गुणवत्ताही पूर्वीसारखी राहिलेली नाही. अशातच तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी रंगाची उधळण करताना त्यात कोणते रसायन वापरलेले नसावे. पण तुम्ही वजारातून रंग विकत घेण्याऐवजी तुम्ही फुलांपासून घरी वेगवेगळ्या रंगांचे रंग तयार करू शकता.

गुलाबी रंग कसा बनवायचा

जर तुम्हाला गुलाबी रंग बनवायचा असेल तर प्रथम गुलाबाची पाने धुऊन स्वच्छ करा आणि नंतर मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. आता गरजेनुसार कॉर्नस्टार्च मिक्स करा. दोन्ही गोष्टी समान प्रमाणात घेता येतात. हे देखील मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर ते प्लेटवर पसरवा आणि चांगले कोरडे होऊ द्या. तयार केलेले मिश्रण सुकल्यावर त्याचे तुकडे करा आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर बनवा आणि नंतर बारीक चाळणीतून रंग चाळून घ्या. अशा प्रकारे गुलाबी रंग तयार होईल. सुगंध आणखी वाढवण्यासाठी तुम्ही परफ्यूम वापरू शकता.

अशा प्रकारे झेंडूपासून पिवळा रंग तयार करा

गुलाबाप्रमाणेच तुम्ही झेंडूच्या पाकळ्यांपासून पिवळा रंग तयार करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला झेंडूची पाने खूप काळजीपूर्वक निवडावी लागतील. पाकळ्यांचा फक्त वरचा भाग घ्या. ते बारीक करा आणि नंतर त्यात कॉर्न स्टार्च घाला आणि पुन्हा तीच प्रक्रिया करा. अशा प्रकारे तुमचा पिवळा रंग तयार होईल.

जांभळा आणि निळा रंग तयार करण्यासाठी या फुलांचा वापर करा

जर तुम्हाला जांभळा रंग तयार करायचा असेल तर लैव्हेंडरचे फुल, जांभळ्या ट्यूलिप सारखी फुले वापरता येतील. त्यातच तुम्हाला जर निळा रंग बनवायचा असेल तर तुम्ही अपराजिताच्या निळ्या फुलापासून रंग बनवू शकता जे दिसायला अप्रतिम दिसते. त्यातच गुलाबी रंग बनवताना जी प्रक्रिया केली आहे तशीच प्रक्रिया तयार करायची आहे.

तुम्ही या गोष्टींपासून गुलाल देखील बनवू शकता

पिवळ्या रंग तयार करण्यासाठी तुम्ही कच्ची हळद देखील बारीक करून आणि त्यात कॉर्न स्टार्च मिक्स करून पिवळा रंग तयार करू शकता. हिरव्या रंगासाठी तुम्ही कॉर्नस्टार्च आणि पालक वापरू शकता. जर तुम्हाला हलका हिरवा रंग बनवायचा असेल तर बेसन आणि पालक यांचे मिश्रण चांगले आहे. अशाप्रकारे, या सोप्या पद्धतीने घरी सेंद्रिय रंग बनवून रंगपंचमी अधिक आनंददायी खेळता येईल, कारण रासायनिक रंग त्वचा, केस, डोळे आणि आरोग्यासाठी हानिकारक असतात. ज्याचा अनेकांना खूप त्रास होतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.