चाणाक्य म्हणतात लोक सहज तुम्हाला तालावर नाचवतील, आजच ‘या’ सवयींना कर स्वाहा

आजच्या काळात मदत करणारे कमी पण फायदा घेणारे लोक अधिक आहेत, काही लोक असे देखील जे तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवतील. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा... आणि आजच स्वतःचा काही सवयी बदला.

चाणाक्य म्हणतात लोक सहज तुम्हाला तालावर नाचवतील, आजच या सवयींना कर स्वाहा
| Updated on: May 21, 2026 | 3:11 PM

अनेक लोक अशी असतात ज्यांना इतरांना आपल्या तालावर नाचवायला प्रचंड आवडते.. ते सर्वांवर वर्चस्व गाजवण्यासाठी टपून बसलेले असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे,आपल्या काही सवयी आणि कमकुवतपणामुळे, इतर लोक सहजपणे आपल्यावर वर्चस्व गाजवतात आणि आपण त्यांच्या तालावर नाचू लागतो. आचार्य चाणक्य असा इशारा देतात की, जर या सवयी वेळेवर बदलल्या नाहीत, तर आपण तुम्ही आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारशक्ती गमावून बसाल.

आत्मविश्वासाचा अभाव : आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, ती व्यक्ती आयुष्यात स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. अशा व्यक्ती लहान-मोठ्या गोष्टींसाठी नेहमी इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात. जेव्हा असे वारंवार घडते, तेव्हा काही काळानंतर इतर लोक या कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊ लागतात. जेव्हा तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते, तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत बनता. इतर लोक तुमच्या आयुष्यावर सहजपणे नियंत्रण ठेवतात, यामागील हे एक मुख्य कारण आहे.

सर्वांना खूश करण्याची सवय : काही लोकांना इतरांना खूश करण्यासाठी सवय असते. ते कोणालाही नाही म्हणत नाहीत. आचार्य चाणक्यांच्या मते, ही प्रवृत्ती माणसाला कमजोर करते. तसेच, जो माणूस सतत इतरांच्या सुखाचा विचार करतो, तो स्वतःच्या गरजा आणि सुखाकडे दुर्लक्ष करू लागतो. यामुळे, इतर लोक त्याला सहजपणे नियंत्रित करू लागतात. म्हणून, इतरांना खूश करण्यासाठी जगण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःसाठी जगायचे आहे.

चुकीच्या संगतीचाही परिणाम होतो : चाणक्याच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात चुकीच्या संगती निर्माण होऊ लागल्या, तर त्याचा त्याच्या विचारांवर आणि वर्तनावर लक्षणीय परिणाम होतो. जे धूर्त आणि स्वार्थी असतात, ते अनेकदा स्वतःच्या फायद्यासाठी कमकुवत मनाच्या लोकांचा गैरफायदा घेतात.
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या इच्छा, स्वप्ने आणि विचारांना महत्त्व देणे थांबवते, तेव्हा ती इतरांच्या इच्छेनुसार आपले जीवन जगू लागते. चाणक्य म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने आपली ओळख आणि आत्मसन्मान जपणे आवश्यक आहे. जे स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखतात, ते सहजपणे इतरांच्या नियंत्रणाखाली येतात. त्यामुळे, इतरांच्या प्रभावाखाली येणे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतांवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Follow Us