Pitra Paksha 2026: श्राद्धाच्या वेळी कामळा दिसला नाही तर…, कोणाला खाऊ खालावं? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं
Pitra Paksha 2026: पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करतो आणि कावळ्यांना घास ठेवतो. पण श्राद्धाच्या वेळी कावळा दिसला नाहीतर, कोणाला घास खाऊ घालावा? याबद्दल शास्त्र काय सांगतं जाणून घ्या...

Pitra Paksha 2026: सध्या पितृपक्षाचे दिवस सुरु आहेत, या दिवसांमध्ये फक्त आपण आपल्या पूर्वजांना पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. या दिवसांमध्ये आपण कावळ्यांना घास घालतो. सांगायचं झालं, श्राद्धादरम्यान ब्राह्मणांसोबत गायी, कुत्रे, कावळे आणि इतर सजीवांना भोजन देण्याची परंपरा खूप जुनी आहे. मग पितृपक्षात लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की, जर कावळ्याने श्राद्धाचं अन्न खाल्लं नाही, तर काय करावं? तर जाणून घ्या कावळ्याने खाल्ल नाही तर, कोणाला खाऊ घालावं..
हिंदू धार्मिक परंपरेनुसार, कावळ्यांना पूर्वजांशी जोडलं जातं. असं मानलं जातं की, श्राद्धाच्या दिवशी कावळ्यांना खाऊ घातल्याने ते अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचतं. याचं कारण असं की, श्राद्ध विधी पूर्ण झाल्यावर कावळ्यांना खाऊ घालण्याची परंपरा आहे. जर श्राद्धाच्या दिवशी कावळ्यांना खाऊ घातलं नाही, तर त्यावर काही इतर उपायही आहेत. तर ते उपाय कोणते आहेत, जाणून घ्या.
धार्मिक परंपरेनुसार, श्राद्धाचे अन्न गायी, कुत्रे आणि इतर प्राण्यांना अर्पण करावं, असं मानलं जातं. यामध्ये देवता, गायी, कुत्रे, कावळे आणि मुंग्या इत्यादींसाठी अन्न बाहेर काढण्याची प्रथा आहे. यासाठी, जर कावळे उपलब्ध नसतील, तर श्राद्धासोबत अन्नाचा एक छोटासा भाग गायी आणि कुत्र्यांनाही दिला जाऊ शकतो. अन्नाचा काही भाग मुंग्या आणि इतर लहान कीटकांनाही दिला जाऊ शकतो.
श्राद्धात ब्राह्मणांना भोजन देण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, श्रद्धेनं ब्राह्मणांना भोजन देऊन आणि श्राद्धात दक्षिणा देऊन पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे, जर कावळा आला नाही, तर केवळ यामुळे श्राद्ध अपूर्ण मानलं जाऊ नये. विधीनुसार श्राद्धाचा विधी पूर्ण झाल्यावर ब्राह्मणांना भोजन देता येते. गायी, कुत्रे इत्यादींसाठीही अन्न बाहेर काढता येते.
अनेक धार्मिक परंपरांमध्ये श्राद्धादरम्यान पंचबलीचा उल्लेख आढळतो. याअंतर्गत, विविध प्राणी आणि देवतांना अन्नाचा छोटासा भाग अर्पण करण्याची परंपरा आहे. सामान्यतः देवता, गायी, कुत्रे, कावळे आणि मुंग्या यांना अन्न अर्पण करण्याची ही परंपरा आहे.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
