
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही समस्या निर्माण होत असतील जसं की पैशांची कमतरता, कार्यात यश न मिळणं, छोट्या -छोट्या गोष्टींवरून भांडणं, कितीही पैसा कमावला तर तो हातात न टिकणं अशा असंख्य समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण रोजच्या आयुष्यात अशा काही छोट्या -छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, आणि घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात.
अनेकदा आपण खूप पैसा कमावतो, परंतु पैसा हातात टिकतच नाही, असं आपल्यासोबत अनेकदा होतं. यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्यास सदैव तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि तुम्ही जो पैसा कमवाल तो तुमच्या घरात टिकून राहील, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगीतलं आहे त्याबद्दल
कोळीचे जाळे – वास्तुशास्त्रानुसार घरातील स्वच्छतेला खूप महत्त्व असते, ज्या घरात स्वच्छता असते, साफ-सफाई असते त्या घरावर सदैव लक्ष्मी माता प्रसन्न राहाते, त्यामुळे घरात कधीच पैशांची कमी जाणवत नाही, तुम्ही जो पैसा कमवता तो पैसा तुमच्या घरात टिकून राहातो. अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.
भिंतीवरील अनावश्यक डाग – वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही राहत असलेल्या घरात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तेथील भिंतीवर अनावश्यक डाग असतील तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे असे डाग वेळेच्या वेळी काढले किवा पुसले गेले पाहिजेत.
पाण्याचं लिकेज – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नळ गळका असेल किंवा पाण्याचं लिकेज होत असेल तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशा नळांची ताबडतोब दुरूस्ती केली पाहिजे, जर तुमच्या घरातील एखादा नळ गळत असेल तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात, वास्तुदोषामुळे काहीही कारण नसताना अचानक अनेक समस्या उद्भवतात. मात्र जर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्यास हे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)