AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात असेल वास्तूदोष तर गुग्गूळ धूपाचा हा उपाय आहे प्रभावी, दूर होते नकारात्मक उर्जा

उदबत्तीच्या सुगंधाने वातावरण शुद्ध होते आणि देव लवकर प्रसन्न होतात, अशी धार्मीक श्रद्धा आहे. घरांमध्ये धूप  करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, धुपामध्ये टाकलेल्या वेगवेगळ्या सामग्री आपल्याला विविध प्रकारची फळे देतात.

घरात असेल वास्तूदोष तर गुग्गूळ धूपाचा हा उपाय आहे प्रभावी, दूर होते नकारात्मक उर्जा
गुग्गूळ धूपImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 29, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : देवी-देवतांच्या आवाहनासाठी पूजेदरम्यान दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भगवंताच्या पूजेत अगरबत्ती आणि धूप लावण्यालाही तितकेच महत्त्व आहे. उदबत्तीच्या सुगंधाने वातावरण शुद्ध होते आणि देव लवकर प्रसन्न होतात, अशी धार्मीक श्रद्धा आहे. घरांमध्ये धूप  करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो, धुपामध्ये टाकलेल्या वेगवेगळ्या सामग्री आपल्याला विविध प्रकारची फळे देतात. यापैकी एक म्हणजे गुग्गूळचा धूप. चला जाणून घेऊया घरी गुग्गूल धूप (Guggul Dhup Upay) जाळण्याचे फायदे.

गुग्गूल धूपचे फायदे:

तणाव मुक्तीसाठी फायदेशीर

गुग्गल धूप खूप फायदेशीर मानली गेली आहे. जर कुटुंबात दररोज संकटे येत असतील. पती-पत्नीमध्ये नेहमी वादाचे प्रसंग उद्भवत असतील तर रोज गुग्गूळाचा धूप लावावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि वातावरण तणावमुक्त होईल.

नकारात्मक उर्जा नष्ट होते

असे मानले जाते की गुग्गलमध्ये वाईट शक्तींना दूर ठेवण्याची क्षमता आहे. याच्या धुरामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्योतिष शास्त्रानुसार 7 दिवस पिंपळाच्या पानांसह संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे  नंतर नकारात्मक उर्जा दुर करण्यासाठी गुग्गूळचा धूप जाळावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होईल.

वाईट गोष्टी घडत असल्यास

कधी-कधी वास्तुदोष, पितृदोष यामुळे माणसाला अनेक प्रयत्न करूनही यश मिळू शकत नाही. यामध्ये गुग्गूळ, पिवळी मोहरी, गाईचे तूप आणि धूप मिसळा याचा रोज संध्याकाळी धूप करा सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.

गुग्गूळमध्ये अनेक फायदेशीर घटक आहेत. याच्या वासामुळे हवेतील जंतू नष्ट होतात असे म्हणतात. पावसाळ्यातील बहुतांश आजार हे जीवाणू आणि विषाणूंच्या प्रसारामुळे होतात. गंभीर आजार टाळण्यासाठी गुग्गूळचा धूप रोज करावा. यामुळे वातावरण शुद्ध आणि सुगंधित राहील. या धूपाचा सुगंध केवळ देवांनाच प्रसन्न करत नाही तर माणसाचा मानसिक थकवाही दूर करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?