सकाळी उठल्यावर ही 5 कामं कधीही करू नका; तुमचा संपूर्ण दिवस खराब जाईल
सकाळी लवकर उठणे शुभ मानले जाते, पण काही चुकांमुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर अशा 5 असतात ज्या करणे टाळले पाहिजे. ज्यामुळे मानसिक अशांतता आणि अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.

आपण अनेकदा है ऐकलं आहे की सकाळी लवकर उठणे चांगले असते. दिवसाची सुरुवात ही सकाळी लवकर उठण्यासोबतच चांगल्या कामांनी करावी असही म्हटलं जातं. आणि खरोखरच काही लोक ही नियम अगदी तंतोतंत पाळताना दिसतात. वैदिक ज्योतिष आणि शास्त्रांमध्ये, सकाळ हा दिवसाचा सर्वात पवित्र आणि शक्तिशाली भाग मानला जातो. स्कंद पुराण, मनुस्मृती आणि गरुड पुराणानुसार, ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच सूर्योदयापूर्वीचा काळ हा आध्यात्मिक साधना, ध्यान आणि शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम आहे. यावेळी, सूर्य, चंद्र आणि गुरु यासारख्या शुभ ग्रहांचा प्रभाव मन आणि आत्म्याला सकारात्मक ऊर्जा देतो.
पण काहीवेळेला कळत-नकळत सकाळच्या वेळी अशा काही गोष्टी आपल्याकडून घडतात की त्यामुळे संपूर्ण दिवस खराब होतो. तसेच दिवसभर अशांतता, अडथळे आणि तणाव निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव, अशी काही कामे असतात जी सकाळी उठल्यावर कधीही करू नयेत. चला जाणून घेऊया अशी कोणती कामे आहेत जी सकाळी कधीही करू नयेत.
उशीरापर्यंत अंथरुणात पडून राहणे
मनुस्मृती आणि स्कंद पुराणानुसार, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे न होणारी व्यक्ती तमसाच्या प्रभावाखाली येते, ज्यामुळे सूर्य आणि गुरु ग्रहाचे शुभ प्रभाव कमी होतात. जास्त वेळ अंथरुणावर पडल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे दिवस कंटाळवाणा, तणावपूर्ण आणि अशुभ होतो असे म्हटले जाते. त्यासाठी लवकर झोपून सकाळी लवकर उठणे आरोग्य आणि मनासाठीही चांगले आहे.
नकारात्मक विचार, गप्पा करणे टाळावे
स्कंद पुराणानुसार, सकाळ हा आध्यात्मिक विचार आणि भक्तीचा काळ आहे. नकारात्मक विचार, गप्पा चंद्र आणि गुरु ग्रहाला कमकुवत करतात, तर राहूचा प्रभाव वाढवतात. यामुळे दिवसभर मानसिक अशांतता, चुकीचे निर्णय आणि वाद निर्माण होऊ शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात, राहू हा गोंधळ आणि नकारात्मकतेचा ग्रह आहे. जो सकाळच्या पवित्रतेला भंग करतो.
अंघोळ न करता देवाची पूजा करू नये किंवा काही खाऊ नये
गरुड पुराणात स्नान हा सकाळचा सर्वात महत्त्वाचा विधी मानला आहे. स्नान न करता पूजा करणे, खाणे किंवा चहा किंवा कॉफी पिणे शरीर आणि आत्म्याच्या शुद्धतेला हानी पोहोचवते असे म्हटले जाते. यामुळे शनि आणि राहूचा नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे दिवस अशुभ होतो. ज्योतिषशास्त्रात, स्नान चंद्र आणि शुक्र ग्रहांच्या सकारात्मक उर्जेला वाढवते असे मानले जाते.
सकाळी वाद, कटकट करू नये
सकाळची वेळ ही पवित्र आणि प्रसन्न असते आणि दिवसाची सुरुवात तशीच झाली पाहिजे. त्यामुळे सकाळी घरात भांडणे, वाद, कटकट होऊ नये यासाठी प्रयत्न करा. तसेच सकाळी घरात शिव्या देणे किंवा मोठ्याने वाद घालणे यामुळे मंगळ आणि राहूचा नकारात्मक प्रभाव वाढतो. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि दिवसभर तणाव, अपयश आणि नातेसंबंधात कटुता येते.
सकाळी लवकर उठून प्रार्थन आणि मंत्रजाप करावा
स्कंद पुराण आणि वैदिक ज्योतिषशास्त्रात, सकाळची प्रार्थना आणि मंत्रांचे फार महत्त्व सांगितले आहे. प्रार्थना वगळल्याने गुरु आणि सूर्याचा प्रभाव कमकुवत होतो आणि शनि किंवा राहूचे नकारात्मक प्रभाव वाढू शकतात. यामुळे दिवसभर अडथळे, मानसिक अशांतता वाढू शकते. त्यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाला नमस्कार करणे, प्रार्थना करणे शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
