Chanakya Niti: ‘या’ ठिकाणी लाज बाळगली तर आयुष्यातून व्हाल बरबाद
प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनेक समस्यांमधून वाट काढत जावेच लागते. तेव्हाच माणूस हा यशस्वी होतो. त्यात माणसांनी अश्या काही ठिकाणी आजिबात लाजलं नाही पाहिजे. त्यात ज्याला ज्या ठिकाणी लाज वाटेल तेव्हा तो माणूस आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही. कारण लाज वाटू घेतल्याने माणसाची हिंमत पुढे सरसावत नाही. लाजेपोटी स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. त्यामुळे कामात अपयश निर्माण होतात.

आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपल्या समाजात लाखोंच्यावर लोकं त्यांच्या यशाच्या शिखरावर आहे. कारण त्यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान व्यक्तींपैकी एक मानले जायचे. राजासह राज्यातील एखादी व्यक्ती कुठल्याही संकटात सापडली किंवा कुठल्याही मताची गरज भासली की तो प्रथम आचार्य चाणक्य यांच्याकडे जाऊन सल्ला घेत असे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या हयातीत अनेक धोरणांची रचना केली होती, जी पुढे चाणक्य नीती म्हणून ओळखली जाऊ लागली.
मानवजातीच्या भल्यासाठी चाणक्य यांनी अनेक प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्य नीतीमध्ये ही काही ठिकाणे आणि परिस्थितींचा उल्लेख केला आहे जिथे माणसाला कधीही लाज वाटू नये. जर तुम्हाला या ठिकाणांची लाज वाटली तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. चला जाणून घेऊया अशा परिस्थितीबद्दल जिथे एखाद्या व्यक्तीला कधीही लाज वाटू नये.
जेवताना लाज बाळगू नका
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जेवताना माणसाने कधीही लाज बाळगू नये. जेवताना ज्याला लाज वाटते त्याचे पोट कधीच भरत नाही आणि तो उपाशी राहतो. चाणक्य नीतीनुसार अर्धवट पोट भरलेले आणि उपाशी राहिल्याने व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. कधी कधी भुकेमुळे माणसं चुकीचे निर्णयही घेऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या निर्णयामुळे त्यांना आयुष्यात प्रगती करता येत नाही.
पैशाच्या व्यवहारात लाज बाळगू नये
चाणक्य नीतीनुसार माणसाने पैशाच्या व्यवहाराची कधीही लाज बाळगू नये. जर तुम्ही कुणाला कर्ज किंवा उधारी दिले असेल तर तुम्ही कोणताही संकोच न बाळगता त्यांच्याकडे पैसे मागितले पाहिजेत. तुम्हाला स्वतःचे आणि कष्टाचे पैसे मागायला कधीही लाज वाटली नाही पाहिजे. जर तुम्हाला तुमचे पैसे मागायला लाज वाटत असेल तर तुम्हाला नेहमी पैशांशी संबंधित समस्येतून जावे लागेल.
आपले शब्द पाळण्यास लाज बाळगू नका
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीने आपल्या गोष्टी इतरांसमोर ठेवण्यास कधीही संकोच करू नये. एखादी गोष्ट योग्य वाटत असेल तर ती बरोबर सांगा आणि चुकीची वाटत असेल तर ती चुकीची म्हणा. जो माणूस आपल्या मनातील बोलण्यास कचरतो, तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही.
शिक्षण घ्यायला लाज बाळगू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते माणसाने नेहमी नवीन गोष्टी शिकत राहिले पाहिजे. तुम्ही कोणाकडूनही शिक्षण घेऊ शकता. शिक्षण देणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठी असेलच असे नाही. तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीसुद्धा तुम्हाला नवीन गोष्टी शिकवू शकते. अनेकदा लहान मुलांकडून गोष्टी शिकायला आपल्याला लाज वाटते आणि आपण संकोच करू लागतो. जर तुम्हीही शिक्षण घेण्यास लाजत असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास खूप त्रास होऊ शकतो.
