AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagannath Rath Yatra 2025 : यंदा कोणत्या तारखेला निघणार रथ? जाणून घ्या सविस्तर…

जगन्नाथ रथ यात्रा ही हिंदू धर्मातील एक पवित्र आणि ऐतिहासिक परंपरा आहे. दरवर्षी उडीसा राज्यातील पुरी शहरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना भव्य रथांवरून श्रीगुंडिचा मंदिरापर्यंत नेण्याची परंपरा असते. ही यात्रा भक्तांसाठी विशेष धार्मिक महत्त्वाची मानली जाते.

Jagannath Rath Yatra 2025 : यंदा कोणत्या तारखेला निघणार रथ? जाणून घ्या सविस्तर...
jagannath rath yatra
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 9:52 PM
Share

भारताच्या प्राचीन धार्मिक परंपरांमध्ये जगन्नाथ रथयात्रेचं एक विशेष स्थान आहे. ओडिशाच्या पुरी शहरात दरवर्षी आषाढ महिन्यात (साधारणतः जून-जुलैमध्ये) लाखो भक्त या दिव्य सोहळ्यात सहभागी होतात. भगवान जगन्नाथ, त्यांच्या भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रा यांचे भव्य रथ रंगीबेरंगी कापडांनी सजलेले असतात आणि तीन मजली उंचीचे असतात. या रथयात्रेला केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.

रथांचा रंग

लाल, पिवळा, काळा आणि हिरव्या रंगाच्या छत्र्या असलेले हे रथ तीन मजली उंचीचे असतात. भगवान जगन्नाथ हे काळ्या रंगाचे असतात, बलराम पांढरट रंगाचे आणि सुभद्रा पिवळ्या रंगाची. या तिन्ही मूर्तींचे डोळे मोठे गोल आणि हास्य भरलेले असते. त्यांच्या हातपाय नसतात, पण भक्तीचा चेहरा असतो.

काय आहे रथयात्रेची पौराणिक कथा?

ब्रिटिश लोकांनी जेव्हा भारतावर राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना हा उत्सव पाहून आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याचे वर्णन “भयावह आणि अज्ञात शक्तीचा प्रतीक” असं केलं. त्याच अनुभवावरून इंग्रजीत ‘जगरनॉट’ हा शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ प्रचंड शक्तिशाली आणि अडथळे तोडणारी ताकद असा होतो.

रथयात्रेची वैशिष्ट्ये काय?

रथयात्रेची सुरुवात प्रत्यक्ष मिरवणुकीच्या दोन आठवडे आधी होते. याला ‘स्नानयात्रा’ असे म्हणतात, त्या दिवशी मंदिरातील देवतांना बाहेर काढून पवित्र पाण्याने स्नान घालतात. यानंतर असं मानलं जातं की देव आजारी पडतात. त्यांना मंदिरातल्या खास खोलीत १५ दिवसांसाठी विश्रांतीसाठी ठेवतात. या काळात पुजारी त्यांच्यावर हर्बल औषधांनी उपचार करतात आणि त्यांना नव्याने रंगवतात.

१५ दिवसांनी जेव्हा देव पुन्हा तयार होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या खास रथांमध्ये बसवून रथयात्रा सुरू केली जाते. हजारो भक्त त्यांच्या रथांना ओढतात आणि ते २ मैल दूर असलेल्या गुंडिचा मंदिरात जातात. तिथे ते ९ दिवस राहतात आणि पुन्हा मंदिरात परत येतात.

रथयात्रेची सुरुवात कधी झाली ?

१९६७ मध्ये भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी पहिली रथयात्रा सॅन फ्रान्सिस्को शहरात घेतली. यानंतर हा उत्सव भारताबाहेरही प्रसिद्ध झाला आणि त्याचं अध्यात्मिक महत्त्व जगभरात पोहोचलं.

रथयात्रा ही फक्त मिरवणूक नाही, तर ती भक्ती, परंपरा, आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे. हे एक असं दिव्य पर्व आहे जे हजारो लोकांच्या श्रद्धेने दरवर्षी पुरीच्या रस्त्यावर उजळून निघतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.