AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या बुध प्रदोष व्रत कथा

एकादशी प्रमाणेच प्रदोष व्रतलाही (Pradosh Vrat 2021) खूप पुण्यदायी मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते.

Pradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या बुध प्रदोष व्रत कथा
शंकराला बेलपत्र अर्पण करताना या गोष्टी ठेवा लक्षात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 2:02 PM
Share

मुंबई : एकादशी प्रमाणेच प्रदोष व्रतलाही (Pradosh Vrat 2021) खूप पुण्यदायी मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. धर्मग्रंथानुसार प्रदोष व्रताचे नाव आणि महत्त्व त्या दिवसानुसार असते (July Month First Pradosh Vrat 2021 Know The Vrat Katha).

आषाढ महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 7 जुलै 2021 रोजी बुधवारी आहे. बुधवारचा प्रदोष बुध प्रदोष व्रत म्हणूनही ओळखला जातो. मान्यता आहे की भोलेनाथ आपल्या भक्तांची भक्ती पाहून खूप लवकर प्रसन्न होतात. महादेव मनुष्य, राक्षस, भुत, यक्ष इत्यादींचे आराध्य आहेत. चला प्रदोष व्रतचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धत जाणून घेऊया –

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

? प्रदोष व्रत आरंभ – 7 जुलै दुपारी 01:02 वाजता

? प्रदोष व्रत समाप्त – 8 जुलै 2021 रोजी पहाटे 3.20 वाजता

? भगवान शिवच्या पूजेचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी 07:12 ते 09:20

प्रदोष व्रत पूजा पद्धत

– शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

– प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा.

– या दिवशी भाविक निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात.

– भांग, धतुरा, बेलपात्र, फुले आणि जलने भगवान शंकरांचा अभिषेक करावा.

– पूजेवेळी देवी पार्वतीला लाल ओढणी आणि श्रृगांराच्या वस्तू अर्पण कराव्यात.

– विधीवत शिव पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व त्रास दूर होतात.

जाणून घ्या व्रत कथा –

एका पुरुषाचे नवीन लग्न झाले होते. गौना झाल्यानंतर तो दुसऱ्यांदा आपल्या पत्नीला घेण्यासाठी आपल्या सासरी पोहोचला. बुधवारी पत्नीला घेऊन जाण्यास कुटुंबातील सदस्यांनी नकार दिला, पण त्याने ऐकलं नाही. अखेर सासू-सासऱ्यांनी जावई आणि मुलीला दु:खी मनाने निरोप दिला. दोघे पती-पत्नी बैलगाडीवरुन घरी निघून गेले. ते शहराबाहेर पोहोचताच त्याच्या पत्नीला खूप तहान लागली आणि तिने आपल्या पतीला ते सांगितले. पती पाणी आणायला गेला, जेव्हा तो परतला तेव्हा पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत उभी राहून पाणी पित होती आणि हसून हसून बोलत होती. दिसायला तो पुरुष हुबेहुब त्याच्यासारखाच दिसत होता. हे पाहून पतीला पहिले आश्चर्य वाटले, त्यानंतर तो त्या दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन भांडणं करु लागला. हळूहळू तेथे मोठा लोकसमुदाय जमला. त्यावेळी एक सैनिकही आला.

शिपायाने त्या पत्नीला विचारले की त्या दोघांपैकी तुमचा पती कोण आहे? ती स्त्री संशयात होती कारण ते दोघेही एकसारखे दिसत असल्याने ती गप्प राहिली. बायकोला गप्प बसलेले पाहून तिचा नवरा मनातल्या मनात भगवान शंकरांना प्रार्थना करु लागला की हे भगवान मला आणि माझ्या बायकोला या त्रासातून वाचवा. बुधवारी माझ्या पत्नीला घेऊन आल्याने मी केलेल्या गुन्ह्याबद्दल मला क्षमा करा. मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. त्याची प्रार्थना ऐकून देव दयाळू झाले आणि त्याच क्षणी दुसरा मनुष्य कुठेतरी अदृश्य झाला. यानंतर, तो माणूस पत्नीसह सुरक्षितपणे आपल्या शहरात पोहोचला आणि त्याने आणि त्यांची पत्नी नियमांनुसार प्रदोष व्रत करण्यास सुरवात केली.

July Month First Pradosh Vrat 2021 Know The Vrat Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

Ashad Month 2021 | भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आषाढ महिन्यात ही कामं करा, पूर्ण होईल सर्व मनोकामना

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.