AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartiki Ekadashi 2023 : विठ्ठलाचे प्रेरणादायी अभंग, कार्तिकी एकादशी निमित्त ठेवा व्हाट्सअप स्टेटस

Sundar te Dhyan Vitthal abhanga Marathi कार्तिकी एकादशी निमित्त तुमच्या आप्तेष्ठांना पाठवा विठ्ठलाच्या सुंदर आणि प्रेरणादायी ओव्या. या ओव्या संत तुकाराम महाराजांनी रचल्या आहेत. अत्यंत अर्थपूर्ण असलेल्या या ओवांमध्ये आयुष्याचा सार सामावलेला आहे. हे तुम्ही व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्टेटस देखील ठेवू शकता.

Kartiki Ekadashi 2023 : विठ्ठलाचे प्रेरणादायी अभंग, कार्तिकी एकादशी निमित्त ठेवा व्हाट्सअप स्टेटस
विठ्ठल रूक्मिणी Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 23, 2023 | 2:33 PM
Share

मुंबई  :  आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्त अनेकांना उपवास ठेवला असेल. अनेकांनी जवळपास विठ्ठल मंदिरात किंवा देवस्थानात दर्शनाला जाण्याचा बेत आखला असेल. विठ्ठलाचे परम भक्त असलेले संत तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाचे अनेक प्रेरणादायी अभंग (Vitthal Abhanga) लिहिले आहेत. अशेच काही प्रेरणादायी अभंग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे अभंग आणि ओव्या तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच आप्तेष्ठांनासुद्धा पाठवू शकता.

प्रेरणादायी अभंग

  1. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
  2. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
  3. राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
  4. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
  5. गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥
  6. वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
  7. हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.