Vastu Tips: देवघरात कधीच ठेऊ नये आगपेटी, जाणून घ्या देवघरासंबंधित वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रानुसार देवघराला विशेष महत्त्व आहे. बऱ्याचदा देवघरात अनेक अनावश्यक वस्तू ठेवल्या जातात. व वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.

Vastu Tips: देवघरात कधीच ठेऊ नये आगपेटी, जाणून घ्या देवघरासंबंधित वास्तुशास्त्राचे नियम
देवघर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 4:24 PM

मुंबई, हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर (Mandir) असतं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात (Vastu Tips) देवघरासंबंधीत काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. काही वस्तू देवघरात ठेवल्यास घरात नकारात्मकता येते. या वस्तूंमध्ये आगपेटीच्या देखील समावेश आहे. यासह इतरही काही वस्तू आहेत ज्या देवघरात ठेवणे चुकीचे मानण्यात आले आहे. जाणून घेऊया याबाबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगण्यात आले आहे.

नकारात्मक वस्तू ठेऊ नये

देवघर हे घरातले सर्वात पवित्र स्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार  याठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. देवघरात देवांव्यतिरिक्तपवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्या गोष्टीच ठेवाव्यात. वास्तुशास्त्रानुसार याचे शुभ परिणाम घरातील सदस्यांवर होतो. पुजेशी संबंधित आवश्यक वस्तू ठेवायची वेगळी जागा करावी.

पुजेशी संबंधित साहित्य उघडे ठेऊ नये. ते कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे. याशिवाय दिवा लावल्यानंतर आगपेटीच्या काड्या इकडे तिकडे फेकू नयेत. जळालेल्या या काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही होऊ शकते. देवघरात आगपेटी किंवा लायटर सारख्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो.  सुकलेली फुले आणि इतर निर्माल्य देखील देवघरातून वेळोवेळी स्वच्छ करावे. यामुळे घरात प्रसन्नता राहते.

हे सुद्धा वाचा

गणपतीची मूर्ती किती असाव्या?

देवघरात गणपतीची मूर्ती अवश्य असावी. मात्र, जेव्हा तुम्ही देवघरात गणपतीची मूर्ती ठेवाल, तेव्हा ती मूर्ती सुस्थितीत असणे आवश्यक आहे. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

देवघरात एकापेक्षा जास्त गणपतीची मूर्ती ठेवण्यास हरकत नाही मात्र ती विषम संख्येत नसावी. घरातील मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती ठेवता येतात. या मूर्ती अशा प्रकारे एकत्र ठेवाव्यात की त्यांचे तोंड नेहमी उत्तरेकडे असेल. गणपतीची मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.