Laddu Gopal: लड्डू गोपाळला झोपवताना ‘या’ विशेष गोष्टी लक्षात ठेवा…
Laddu Gopal Puja: अनेकांच्या घरी लड्डू गोपाळची पूजा केली जाते. परंतु लड्डू गोपाळची पूजा करताना काही नियमांचे पालन केले पाहिजेल. लड्डू गोपळाची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढते. पूजा करताना काही विशेष नियमांचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

आजकाल अनेकांच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची म्हणजेच लाडू गोपाळची पूजा आणि सेवा केली जाते. अनेक भक्त लड्डू गोपाळाची लहान मुलांसारखी काळजी घेतली जाते. सकाळी लवकर उठून अंधोळ करण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सर्व गोष्टी लड्डू गोपाळासाठी केल्या जातात. लड्डू गोपाळाची सेवा करणे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. घरामध्ये लड्डू गोपाळची सेवा आणि पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील वातावरण साकारात्मक होण्यास मदत होते. अशा परिस्थितीमध्ये रात्री झोपताना काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहेत.
आपण आपल्या घरातील लहान मुलांना त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी झोपण्यापूर्वी दुध पाजतो, दुधामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. दुधाचे सेवन केल्यास लहान मुलांना शांत झोप लागते. दुधामुळे शरीरात कॅल्शियमची कमतकता भासत नाही. जसे आपण आपल्या घरातील लहान मुलांना रात्री दुध प्यायला देतो तसेच तुम्ही रात्री लड्डू गोपाळला दुध अर्पण करू शकता. लड्डू गोपाळला जेवण अर्पण केल्यानंतर थोड्या वेळात लड्डू गोपाळला दुद अर्पण करा आणि त्यानंतर त्यांना झोपवू शकता.
हिवाळ्यामध्ये अनेकांना वातावरणातील गारव्यामुळे थंडी वाजते. हिवाळ्यात तुम्ही लड्डू गोपाळच्या अंगावर एक छोटासा कपडा पसरवावा आणि लड्डू गोपाळला उबदार कपड्यानी झाकून ठेवावेत. तुम्ही लड्डू गोपाळला झोपण्यासाठी एक छोटी उशीही ठेवू शकता. तुम्ही लड्डू गोपाळची अशी आणि पांघरूण घरच्या घरी तयार करू शकता किंवा बाजारातून खरेदी करू शकता. तुम्ही लड्डू गोपाळला रात्री व्यतिरिक्त सकाळी देखील झोपवू शकतात. त्यामागचे कारण म्हणजे दिवसा लहाान मुलांना देखील झोपवले जाते ज्यामुळे त्यांची चिडचिड होत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला लड्डू गोपाळला उचलून घेयायचे असेल तर त्यांना उचलण्यापूर्वी घंटी किंवा टाळी वाजवा.
जर तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर लड्डू गोपाळला कधीच एकटे सोडू नका. तुमची जर इच्छा असेल तर तुमच्या सोबत लड्डू गोपाळला सोबत घेऊन शकता. परंतु तु्म्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या विष्वासू व्यक्तीकडे तुमच्या लड्डू गोपाळला काही काळासाठी ठेवू शकता. परंतु शक्यत: लड्डू गोपाळला एकटे ठेवू नका ज्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही.