महाकुंभमध्ये या तरुणाने दर तासाला कमवले १००० रुपये, ही मस्त आयडिया होतेय व्हायरल
महाकुंभ मेळ्यात भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. लाखो भाविक स्नान करण्यासाठी संगमावर येत असतात. तर या महाकुंभमेळ्यात अनेकांना काही दिवसांसाठी रोजगार मिळाला आहे. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरूणांने एका तासात 1000 रूपये कमवण्याचा दावा केला जात आहे.

प्रयागराजमधील महाकुंभमेळा हा असा कार्यक्रम आहे जो केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर हजारो लोकांच्या कमाईचे साधन देखील बनला आहे. या मेळ्यात काही जण टुथस्टिक्स विकुन पैसे कमवत आहेत तर अनेक जण चहा विकत आहे. तर यात कुंभमेळ्यामध्ये भाविकांच्या कपाळावर गंधक लावण्याचे काम देखील लोकांना चांगला नफा देत आहे. एवढेच नाही तर या महाकुंभमेळ्यात काही लोकं मॅग्नेटच्या मदतीने नदीच्या संगमामधून भरपूर पैसे काढत आहेत आणि दररोज सोशल मिडीयावर कमाईची नवीन आयाडिया व्हायरल होत आहे. दरम्यान महाकुंभातून अशीच एक आयडिया व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये एक तरूण दर तासाला 1000 रूपये कमवत आहे.
भारतात जुगाड करणाऱ्यांची कमतरता नाही. लोक एकापेक्षा जास्त आयडिया घेऊन येतात. अशातच महाकुंभात पैसे कमवण्याच्या या कल्पनेत या तरूणला काहीही विकण्याची गरज लागलेली नाहीये किंवा कोणतेही काम करायची गरज भासली नाहीये, तर फक्त एकाच ठिकाणी बसून हजारो रुपये कमवत आहे.
ही बिझनेस आयडिया एकदम भारी
महाकुंभात भाविकांची मोठी गर्दी असते आणि त्यामुळेच येथील प्रत्येक वस्तूची झपाट्याने विक्री होत आहे. अशातच आपण कुठेही बाहेर जातो तेव्हा सर्वात मोठी समस्या मोबाईल चार्जिंगची असते. प्रत्येकजण ‘पॉवर बँक’ सोबत ठेवू शकत नाही. या व्हिडिओनुसार, महाकुंभमध्ये असे अनेक भाविक लोक असतील ज्यांना आपले मोबाईल चार्ज करावे लागणार आहेत.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने चार्जिंगसाठी दोन ते तीन बोर्ड लावले आहेत आणि लोक तेथे फोन चार्ज करत आहेत. ज्यामध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते की, हा मुलगा महाकुंभमध्ये फोन चार्ज करण्यासाठी एका तासाचे 50 रुपये घेतो आणि सध्या त्याच्या जवळ किमान 20 फोन चार्जिंग करण्यासाठी आहेत. दरम्यान हा तरूण एका तासाला सुमारे 1000 रुपये कमावतो आणि तोही कोणतेही कष्ट न करता…
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या
या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ भारताबाहेर जाऊ नये’, तर दुसऱ्यानेही असेच लिहिले की, ही टेकनिक बाहेर जाऊ नये, या देशात करोडो तरुणांना रोजगार मिळेल. व्हिडिओवर काही लोक म्हणतात की मुलगा पैसे घेत नाही आणि वापरकर्ते असेही म्हणतात की महाकुंभमध्ये चार्जिंग पॉइंट सहज उपलब्ध आहेत.
