AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 100 वर्षांनी शक्तिशाली महालक्ष्मी राजयोग, या राशी होणार मालामाल, तुमची रास आहे का?

महालक्ष्मी राजयोगाचा लाभ मिळणाऱ्या या भाग्यवान राशींमध्ये तीन राशींचा समावेश होते. आता आपण यात कोणकोणत्या राशी आहेत आणि त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याबद्दल जाणून घेऊया.

तब्बल 100 वर्षांनी शक्तिशाली महालक्ष्मी राजयोग, या राशी होणार मालामाल, तुमची रास आहे का?
| Updated on: Sep 29, 2025 | 4:22 PM
Share

हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. सर्वत्र लाखो दिव्यांची उजळण करत असल्याने याला दीपावली असेही म्हणतात. हा सण अंधारावर प्रकाशाने, असत्यावर सत्याने आणि वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक मानला जातो. यंदा २० ऑक्टोबर २०२५ ला दिवाळी साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तब्बल १०० वर्षांनी हा शक्तिशाली महालक्ष्मी राजयोग बनला आहे.

चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे हा राजयोग तूळ राशीत (Libra) तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यामुळे त्या राशींच्या धन-दौलतीत मोठी वाढ होण्याची आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी राजयोगाचा लाभ मिळणाऱ्या या भाग्यवान राशींमध्ये तीन राशींचा समावेश होते. आता आपण यात कोणकोणत्या राशी आहेत आणि त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याबद्दल जाणून घेऊया.

1. कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा महालक्ष्मी राजयोग अत्यंत अनुकूल ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील भौतिक सुख आणि वाहन (चौथे स्थान) या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. या काळात तुम्ही वाहन किंवा स्थावर मालमत्ता (प्रॉपर्टी) खरेदी करू शकता.

तुमचे दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढीची संधी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत अविस्मरणीय वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही एखादी आलिशान वस्तू देखील खरेदी करू शकता.

2. मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म भावात (दहावे स्थान) तयार होत आहे, जे करिअर आणि व्यवसायाचे स्थान आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या काम-धंद्यात विशेष प्रगती मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.

शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय या काळात लाभदायक ठरतील. तुम्हाला संधींचा फायदा घेता येईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि वडिलांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित लोकांच्या जवळच्या व्यक्तीसोबतचे संबंध वाढू शकतात.

3. कन्या रास

महालक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील धन आणि वाणीच्या स्थानावर (दुसरे स्थान) तयार होत आहे. तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील.

तुम्हाला पैसा कमावण्याचे नवीन मार्ग मिळतील. कामात येत असलेल्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची योजना बनवू शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी