Mahalakshmi Vrat Samapan 2021 : महालक्ष्मी व्रत समापन, जाणून घ्या याची तिथी, मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

महालक्ष्मी व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून सुरु होते. गणेश चतुर्थीनंतर चार दिवसांनी साजरा केला जातो. महालक्ष्मी व्रत सलग सोळा दिवस पाळले जाते. या वर्षी ते 13 सप्टेंबरपासून सुरु झाले असून 28 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.

Mahalakshmi Vrat Samapan 2021 : महालक्ष्मी व्रत समापन, जाणून घ्या याची तिथी, मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी
Goddess-Mahalaxmi

मुंबई : महालक्ष्मी व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून सुरु होते. गणेश चतुर्थीनंतर चार दिवसांनी साजरा केला जातो. महालक्ष्मी व्रत सलग सोळा दिवस पाळले जाते. या वर्षी ते 13 सप्टेंबरपासून सुरु झाले असून 28 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.

महालक्ष्मीचे व्रत श्रीमंतीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. भविष्य पुराणानुसार, जेव्हा पांडवांनी कौरवांच्या हातून जुगारात संपत्ती गमावली, तेव्हा पांडवांपैकी ज्येष्ठ युधिष्ठिराने श्रीकृष्णाला संपत्ती मिळवण्याचा मार्ग विचारला. भगवान श्री कृष्णाने त्यांना महालक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून, देशभरातील भक्त त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा शुभ व्रत पाळतात.

हा दिवस हिंदू चंद्र कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीला येतो. या दिवशी, भक्त एक दिवसाचा उपवास ठेवतात आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेतात.

महालक्ष्मी व्रत कार्यक्रम 2021 : तिथी आणि मुहूर्त

अष्टमी तिथी प्रारंभ – 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:17 पासून
अष्टमी तिथी समाप्त – 29 सप्टेंबर रोजी रात्री 08:30 वाजता

महालक्ष्मी व्रत 2021 : महत्त्व

भविष्य पुराणात म्हटले आहे की जेव्हा पांडवांनी कौरवांकडे जुगारात आपली संपत्ती गमावली तेव्हा पांडवांपैकी ज्येष्ठ युधिष्ठिराने श्रीकृष्णाला श्रीमंती मिळवण्याचा मार्ग विचारला. भगवान श्री कृष्णाने त्यांना महालक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला दिला.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून महालक्ष्मी व्रताला सुरुवात होते. गणेश चतुर्थीनंतर चार दिवसांनी साजरा केला जातो. महालक्ष्मी व्रत सलग सोळा दिवस पाळले जाते. धन आणि समृद्धीसाठी देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले जाते.

महालक्ष्मी व्रत 2021 : पूजा करण्याची पद्धत आणि विधी

– सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करुन प्रार्थनास्थळ स्वच्छ करा

– हा एक दिवसाचा उपवास आहे, म्हणून त्यासाठी प्रतिज्ञा घ्या.

– एका पाटावर महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करा.

– श्री यंत्र मूर्तीजवळ ठेवले जाते

– मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवा, त्यावर नारळ ठेवा

– देवीला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करा

– तुपाचा दिवा लावा आणि धूप लावा

– कथा, स्तोत्राचे पठण करा आणि प्रार्थना करा

– महालक्ष्मी स्तोत्राचा जप केल्याने समृद्धी आणि संपत्ती येते

– काही भागात भक्त सूर्य देवाची पूजा करतात आणि सूर्योदयाच्या वेळी सर्व सोळा दिवसांसाठी रोज अर्घ्य अर्पण केले जाते

– आश्विन कृष्ण अष्टमीला व्रताची समाप्ती होते

– संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते

– पूर्ण कुंभच्या शेवटच्या दिवशी कलशची पूजा केली जाते

– कलश आणि नारळामध्ये चंदन, हळद पेस्ट आणि कुमकुम लावले जाते. याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते

– देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि शेवया अर्पण केल्या जातात

– देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरती केली जाते.

– सर्व भाविकांमध्ये प्रसाद वाटला जातो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचं दान करु नये, आर्थिक समस्या उद्भवू शकतात

सुख-समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी घरामध्ये ही झाडे लावा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI