AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalwar Vrat : हनुमानाची कृपा प्राप्त करण्यासाठी करतात मंगळवारचे व्रत, काय आहेत या व्रताचे नियम?

  या दिवशी उपवास आणि व्रत पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारचे व्रत अत्यंत प्रभावी असून साधकाला याचे परिणाम लगेच अनुभवायला मिळतात.

Mangalwar Vrat : हनुमानाची कृपा प्राप्त करण्यासाठी करतात मंगळवारचे व्रत, काय आहेत या व्रताचे नियम?
मंगळवार उपायImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 22, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई : मंगळवार हा बजरंगबली हनुमानाला समर्पित दिवस आहे. अनेक जण या दिवशी उपवास करतात. हनुमानाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी अनेक जण मंगळवारचे व्रत (Mangalwar Vrat) देखील पाळतात.  या दिवशी उपवास आणि व्रत पाळणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारचे व्रत अत्यंत प्रभावी असून साधकाला याचे परिणाम लगेच अनुभवायला मिळतात.  या व्रताने हनुमानजींचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय यासोबतच व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. वाईट कर्मांपासूनही त्याचे रक्षण होते. मंगळ दोषामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात तसेच शुभ कार्यात अडथळे येतात. यासाठी सुद्धा मंगळवारचे व्रत लाभदायक मानले जाते

अशा प्रकारे करा व्रत

मंगळवारी सकाळी आंघोळ केल्यावर लाल रंगाचे कपडे घाला. हनुमानजींची आराधना करा आणि व्रताचा संकल्प घ्या. त्यानंतर मंगळ मंत्राचा जप करावा. यानंतर संध्याकाळी हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हनुमानजींची आरती करावी. जेवणात फक्त गोड पदार्थांचे सेवन करा आणि मीठ टाळा.

या मंत्राचा जाप करा

“ओम अंगारकाय नमः” “ओम क्रीं क्रौं सह भौमाय नमः”

साधकाने 3रा, 5वा, 7वा, 11वा किंवा 21मंगळवार उपवास करून त्याचे उद्यापन करावे. उद्यापन करताना हनुमान किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात 7 नारळ अर्पण करा. पंचामृताचा नैवेद्य दाखवा. गरीब किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा. मंदिरात लाल रंगाचा ध्वज अर्पण करा. उद्यापनाच्या दिवशी रक्तचंदनाची माळ धारण करावी. ही माळ सात दिवस धारण करा.

या चुका टाळा

मंगळवारच्या व्रतामध्ये शुद्धतेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. पूजेच्या वेळी मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. आपण कोणत्याही गोड पदार्थाचे दान केले तर ते स्वतः स्वीकारू नका. काळे किंवा पांढरे कपडे घालून हनुमानजीची पूजा करू नका. लाल कपडे घालणे चांगले. उपवास करणाऱ्याने दिवसातून एकदाच जेवण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?