मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर ‘या’ वस्तू करा अर्पण, तुमच्या जीवनातील कष्ट होतील कमी
हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्या ला विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या पूर्वजांना आणि भगवान शिवांना समर्पित आहे. तसेच या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि मंगल प्राप्त होते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण कराव्यात.

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना आणि त्यात येणारी अमावस्या यांचे विशेष महत्त्व आहे. हा महिना पूर्वजांना समर्पित आहे. तर 20 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे देखील विहित आहे. असे मानले जाते की या दिवशी दान आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवाय या दिवशी शिवलिंगावर तुम्ही मनोभावे काही वस्तू अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील कष्टांपासून मुक्तता होते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात.
काळे तीळ आणि पाणी
मार्गशीर्ष अमावस्येच्या या शुभ दिवशी शिवलिंगावर पाण्यात काळे तीळ मिक्स करून ते पाणी अर्पण करा. तसेच “ॐ नमः शिवाय” चा जप शांतपणे करा. असे म्हटले जाते की या दिवशी काळे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांची पापे शांत होतात आणि तुमच्या जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात.
ऊसाचा रस
शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करा. जर उसाचा रस उपलब्ध नसेल तर साधे पाणी आणि त्यात थोडासा गूळ मिक्स करून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा. असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्तीचे नवीन मार्ग उघडतात.
रूईची फुलं
या दिवशी शिवलिंगावर रूईची फुलं अर्पण करा. असे म्हटले जाते की ही फूलं अर्पण केल्याने भगवान शंकर यांचे आशीर्वाद मिळतात. शिवाय रूईची फुलं अर्पण केल्याने आजार आणि असाध्य दुःखांपासून मुक्तता मिळते. या प्रथेमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारते.
शमी पत्र
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करा. शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने तुमच्यावर असलेले शनीच्या साडेसती, धैय्य आणि इतर अशुभ ग्रहांचे परिणाम कमी होतात. तसेच दुर्दैवाचे सौभाग्यात रूपांतर होते.
बेलाची पाने
या दिवशी शिवलिंगावर 108 बेलाची पाने अर्पण करा. तर बेलाच्या पानांवर “राम” किंवा “ओम” लिहिण्यास विसरू नका. त्यानंतर, शिवलिंगावर मधाच्या पातळ धारेचा अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि नातेसंबंध गोड होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
