मी उलटे चालतो पण तुम्ही सरळ चाला, उलटे चालत शेगाव गाठणाऱ्या बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला

पुण्याच्या फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे गेल्या वीस वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे जात असतात. यंदा त्यांनी विदर्भाची पंढरी शेगावकडे प्रस्थान केले आहे. फुरसुंगी येथून सुमारे 481 किलोमीटरचे अंतर उलटे चालल्यानंतर ते संतनगरीत दाखल झाले आहेत.

मी उलटे चालतो पण तुम्ही सरळ चाला, उलटे चालत शेगाव गाठणाऱ्या बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला
बापूराव गुंडImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 2:35 PM

प्रतिनिधी, गणेश सोळंकी

शेगाव : सुमारे पाचशे किलोमीटर उलट पायी चालत जात देवदर्शन करणारे तसेच या उलट पदयात्रेदरम्यान विविध विषयांवर जनजागृतीसाठी प्रसिध्द असलेले पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथील भाविक बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (Bapurao Gund) हे पुणे ते शेगाव असे 481 किलोमीटरचे अंतर कापून श्री संत गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी संतनगरीत पोहोचले. 18 नोव्हेंबर रोजी ते पुणे येथून निघाले होते. उलट पायी चालत असताना त्यांनी देशवासीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. मी उलटा चालतो पण तुम्ही सरळ चाला असं बापूराव म्हणाले.

बापूराव यांनी दिला मोलाचा सल्ला

पुण्याच्या फुरसुंगी येथील भाविक बापूराव गुंड हे गेल्या वीस वर्षांपासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे जात असतात. यंदा त्यांनी विदर्भाची पंढरी शेगावकडे प्रस्थान केले आहे. फुरसुंगी येथून सुमारे 481 किलोमीटरचे अंतर उलटे चालल्यानंतर ते संतनगरीत दाखल झाले आहेत. मी हा उलट प्रवास मानवतेच्या कल्यानासाठी करत आहो असे बापूराव म्हणाले. उलट चालण्यामागचा हेतू हा लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणूसकी आपूलकी जपावी, देपल्या देशाचा, आई वडीलांचा आणि भारतीय संस्कृतीचा संन्मान करावा असा संदेश त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

यासोबतच त्यांनी स्वच्छतेचादेखील संदेश दिला. आपला कचरा नदी नाल्यात, रस्त्याच्या कडेला टाकू नये. तसेच स्वछतागृहाचा वापर करा असंही त्यांनी सांगितलं. देवाच्या भक्तीसोबतच मी देशाची भक्तीसुद्ध करतो असं म्हणत त्यांनी प्रत्त्येकाला मतदान करण्याचा सल्ला दिला. येणाऱ्या निवडणूकीत मी मतदान करणार आहे तुम्हीसुद्धा मतदान करा तसेच मतदान करताना ते विचारपूर्वक करा असंही बापूराव म्हणाले. वाहतूक नियम पाळण्याचे आवाहनसुद्धा बापूराव यांनी केले आहे.

बापूराव गुंड हे कापड दुकान चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. 20 वर्षापासून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी याच पध्दतीने जाण्याचा त्यांचा शिरस्ता आहे.  उलट पावली चालण्याच्या पध्दतीसह ते या यात्रेत सध्याच्या ज्वलंत विषयांची जनजागृतीही करतात. विशेष म्हणजे त्यांचा हा हटके प्रवास त्यांच्या घरापासून एकट्यानेच सुरू आहे.  मुळगाव फुरसुंगीतून 18 नोव्हेंबरपासून बापूराव गुंड यानी उलट चालण्याच्या यात्रेस सुरूवात केली. तेथुन शिरूर, अहमदनगर, शेवगाव, जालना, देउलगाव राजा मागें चिखली, खामगाव असे सुमारे 481 किमी अंतर चालून ते संतनगरी शेगाव येथे पोहोचले आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.