Mirror Vastu Tips : घरात आरसा लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करा, तुमचं नशीब उजळू शकते

वास्तुनुसार घरात ठेवलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. वास्तु शास्त्रानुसार गोष्टींमुळे घरात आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते. त्याचबरोबर वास्तूनुसार जर गोष्टी ठेवल्या नाहीत, तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तो म्हणजे आरसा.

Mirror Vastu Tips : घरात आरसा लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करा, तुमचं नशीब उजळू शकते
घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 30, 2021 | 9:12 AM

मुंबई : वास्तुनुसार घरात ठेवलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. वास्तु शास्त्रानुसार गोष्टींमुळे घरात आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते. त्याचबरोबर वास्तूनुसार जर गोष्टी ठेवल्या नाहीत, तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तो म्हणजे आरसा. वास्तुनुसार, आरसा सुद्धा तुमचे नशीब बदलू शकतो (Mirror Vastu Tips Mirror Can Change Your Luck Know The Vastu Rules).

जर तुम्ही घरात आरसा चुकीच्या दिशेने ठेवला तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरसा कसा आणि कुठल्या दिशेने लावाला याबाबत वास्तूचे काही नियम जाणून घ्या –

💠 आरसा या दिशेने लावा –

आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. तसेच, तो अशा प्रकारे लावा की जो आरसा पाहिल त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा.

💠 या प्रकारच्या आरशाचा वापर करु नका –

घरात तुटलेले आणि अस्पष्ट आरसा वापरणे टाळा. त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

💠 बेडरुममध्ये असा आरसा ठेवा –

वास्तुनुसार, आरसा बेडच्या समोर ठेवू नका. जर तुमचा आरसा पलंगासमोर असेल तर झोपायच्या आधी आरसा झाकून ठेवा. वास्तविक पाहायचं झालं तर झोपेच्या वेळी आरशात प्रतिबिंब पाहणे अशुभ मानले जाते.

💠 येथे लावलेला आरसा घरातील कर्त्याला प्रभावित करतो –

दक्षिण-पश्चिम दिशे असलेल्या काचेमुळे वास्तू दोष निर्माण होतात. त्याचा परिणाम घराच्या कर्त्या पुरुषावर पडतो. यामुळे, त्याला नेहमीच घराबाहेर रहावे लागते.

Mirror Vastu Tips Mirror Can Change Your Luck Know The Vastu Rules

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही

Temple Vastu Tips | घरात कुठल्या दिशेला आणि कसे असावे पूजाघर, जाणून घ्या त्याबाबतच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें