AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळ्यात सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारियाची चर्चा, कोणता आखाडा आणि कोणाच्या शिष्या? जाणून घ्या

महाकुंभमेळ्यात सर्वच काही दिव्य आणि भव्य आहे. अध्यात्मिक जगातील महापुरुषांचा मेळा जमला आहे. अशा स्थितीत एका साध्वीची चर्चा रंगली आहे. ही साध्वी दुसरं कोणी नसून हर्षा रिछारिया आहे. सर्वात सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हर्षा रिछारिया एक अँकर आणि इनफ्ल्यूएन्सर आहे. चला जाणून घेऊयात तिथे गुरु आणि आखाड्याबाबत...

कुंभमेळ्यात सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारियाची चर्चा, कोणता आखाडा आणि कोणाच्या शिष्या? जाणून घ्या
| Updated on: Jan 14, 2025 | 4:32 PM
Share

प्रयागराज महाकुंभमेळ्यात साधुसंतांचा मेळावा भरला आहे. 144 वर्षानंतर महाकुंभमेळा असल्याने याचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे देशविदेशातील आस्था असणाऱ्या लोकांचं या कुंभमेळ्याकडे लक्ष लागून आहेत. साधुसंताच्या विविध तऱ्हा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. असं असताना महाकुंभ मेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथावर आरूढ होत पोहोचली होती. यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती. हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती. त्यामुळे हर्षाने असं अचानक साध्वी होण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आस्था आणि अध्यात्म्याच्या मार्गावर तिने आपलं पाऊल कसं टाकलं असे प्रश्न तिला पाहता क्षणीच पडतात. चला जाणून घेऊयात हर्षा रिछारियाबाबत.. तिचे गुरु कोण आणि आणि कोणत्या आखाड्यातून आहे ते सर्व

हर्षा रिछारिया ही एक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि अँकर होती. ती दोन वर्षापूर्वीच साध्वी झाली आहे. हर्षा रिछारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजी महाराज आहेत. ते निरंजनी आखाड्यातून येतात. उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा रिछारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही. तिने सांगितलं की, साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरु आहे. अजूनही तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही. हिंदू धर्मात नागा साधु संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरुंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे. हर्षा रिछारियाला अजूनही दीक्षा मिळालेली नाही.

कैलाशानंद गिरीजी महाराज निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर आहेत. त्यांनी लाखो नागा साधु आणि हजारो महामंडळेश्वरांना दीक्षा प्रदान केली आहे. स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज एक महान आणि तपस्वी संत आहेत. ते ज्ञान आणि तपाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध आहेत.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...