Nag Panchami 2021 | आज नाग पंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 13, 2021 | 8:03 AM

सनातन धर्मात साप पूजनीय मानला जातो. महादेव गळ्यात साप धारण करत असतात, तर जगाचा तारणहार नारायण शेषनागावर विराजमान असतात. नाग पंचमीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. नाग पंचमी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते.

Nag Panchami 2021 | आज नाग पंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Nag panchami

मुंबई : सनातन धर्मात साप पूजनीय मानला जातो. महादेव गळ्यात साप धारण करत असतात, तर जगाचा तारणहार नारायण शेषनागावर विराजमान असतात. नाग पंचमीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. नाग पंचमी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते.

नाग पंचमीच्या दिवशी सापांची पूजा करुन त्यांना संरक्षणाचा संदेश दिला जातो. श्रावण महिना महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो. नाग महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करण्याबरोबरच त्यांच्या प्रिय नागांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी नाग पंचमीचा सण आज 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. नाग पंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.

नाग पंचमीचा शुभ मुहूर्त काय?

🔶 पंचमी तिथी प्रारंभ – 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपासून सुरु होईल

🔶 पंचमी तिथी समाप्त – 13 ऑगस्ट रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होईल

🔶 पण नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार साजरा केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 49 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!

भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI