नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!

वैज्ञानिकदृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत.

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!
या दिवशी साजरा केला जाईल नागपंचमीचा सण
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 8:28 AM

मुंबई : सनातन धर्मात नागाला पूजनीय मानले जाते. महादेव गळ्यात नाग धारण करतात, तर दुसरीकडे भगवान विष्णू फक्त शेषनागावरच झोपतात. म्हणून हिंदू धर्मात नागपंचमीचा दिवस नागांच्या पूजेला समर्पित आहे. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांना दूध पाजण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात आणि तो त्या कुटुंबाला कधीही हानी पोहोचवत नाही. यंदा नागपंचमी 13 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध का दिले जाते, ते आपण याठिकाणी जाणून घेऊया. (Why do you give milk to Nag on Panchami, know the scripture behind it)

ही आहे आख्यायिका

नागराजाला दूध प्यायला देण्याच्या परंपरेचा संबंध पांडवांचे वंशज आणि कलियुगाचा पहिला राजा परीक्षित यांच्या कथेशी जोडला जातो. तक्षक सापाच्या दंशाने राजा परीक्षितचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजयने हा संकल्प केला होता की तो पृथ्वीवरील सर्व सापांना संपवून टाकेल. त्यासाठी त्याने एका यज्ञाचे आयोजन केले. यज्ञाच्या प्रभावामुळे जगातील सर्व साप यज्ञकुंडात येऊन पडू लागले.

भयभीत होऊन तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या सिंहासनावर जाऊन लपला. यादरम्यान यज्ञाच्या प्रभावामुळे इंद्राचे सिंहासन हवनकुंडाच्या दिशेने ओढले जाऊ लागले. यावेळी ऋषींनी आणि देवतांनी राजा जन्मजेयाला विनंती केली की जर त्याने जगभरातील सर्व सापांना मारले तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल. राजा जन्मेजयने देवांची विनंती मान्य केली आणि तक्षकाला क्षमा केली. यानंतर यज्ञ कुंडात जळलेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी त्या नागांना गाईच्या दुधाने आंघोळ घातली. यामुळे नागांचा मत्सर शांत झाला.

दूध देण्याची परंपरा

ज्या दिवशी आस्तिक मुनींनी सापांना गायीच्या दुधाने आंघोळ केली, तो दिवस श्रावण महिन्याची पंचमी होता. तेव्हापासून श्रावण महिन्याच्या पंचमीचा दिवस सापांना समर्पित करण्यात आला. यासोबतच नागाला दुधाने आंघोळ करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी नागाची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो. शास्त्रातसुद्धा नागाला दुधाने आंघोळ करण्याचे सांगितले गेले आहे, पण आंघोळ करण्याऐवजी लोकांनी नागांनी दूध देण्याची परंपरा सुरू केली.

नागाला दूध पाजणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे

वैज्ञानिकदृष्ट्या नागाला दूध देणे चुकीचे मानले जाते. यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वास्तविक नाग हा सरपटणारा जीव आहे. सरपटणारे प्राणी दूध पचवू शकत नाहीत. दूध प्यायल्याने त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन होते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

अशी पूजा करा

नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी शेणापासून नाग बनवा किंवा पीठ वा मातीपासून नाग बनवा. धूप, दिवा, कच्चे दूध इत्यादींनी नागदेवतेची पूजा करा. नागांना गहू, भाजलेले हरभरा आणि खीर यांचा प्रसाद अर्पण करा. यानंतर उर्वरित प्रसादाचे लोकांना वाटप करा. (Why do you give milk to Nag on Panchami, know the scripture behind it)

इतर बातम्या

प्रवासी रिक्षात बसला, चालकानेच निर्जनस्थळी मोबाईल-पैसे हिसकावले, थरार सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कसं पकडलं?

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Non Stop LIVE Update
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.